जिल्ह्यातील दहा नगरपालिकांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

सोमवारी आरक्षण सोडत होणार
Reservation Draw
Reservation DrawSakal

नांदेड - एप्रिल २०२० ते मार्च २०२० या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या जिल्ह्यातील दहा नगरपालिकेच्या सदस्य पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांनी ता. नऊ जून रोजीच्या आदेशान्वये जाहीर केलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नगरपालिकांच्या सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता निर्धारीत ठिकाणावर केला जाणार आहे.

देगलूर नगरपालिकेची सोडत उपविभागीय अधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका येथे, मुखेडची सोडत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मुखेड येथे, बिलोलीची सोडत उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका बिलोली येथे, कुंडलवाडीची सोडत उपजिल्हाधिकारी रोहयो यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका कुंडलवाडी येथे, धर्माबादची सोडत उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका धर्माबाद येथे, उमरीची सोडत उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय उमरी येथे, भोकरची सोडत उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका भोकर येथे, मुदखेडची सोडत उपजिल्हाधिकारी पुर्नवसन यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुदखेड येथे, हदगावची सोडत उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका हदगाव येथे, कंधारची सोडत उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका कंधार येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

हिमायतनगर नगरपंचायतीच्‍या सदस्यपदांच्‍या आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम नगरपंचायतीच्‍या सदस्‍य पदांच्‍या आरक्षण सोडतीसाठी (सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे सहायक जिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट यांचे अध्‍यक्षतेखाली आरक्षण व सोडत कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. सर्व संबंधित नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com