Drumstick
sakal
नांदेड - रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर अचानक वाढल्याने गृहिणींसह सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट विस्कळीत झाले आहे. विशेषतः शेवग्याचा दर थेट २०० रुपये किलोवर पोचला आहे.
शहरातील भाजी बाजार आणि हातगाड्यांवर बहुतांश भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लग्नसराईचा हंगाम, अवकाळी पावसामुळे उत्पादनात झालेली घट, वाहतूक खर्चातील वाढ आणि साठेबाजी यामुळे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात सामान्य ग्राहकांसाठी स्वयंपाकघर चालवणे कठीण बनले आहे.