esakal | अशोक चव्हाण सेवा सेतुमुळे प्रशासन झाले गतिमान, सर्व सामान्यांना आधार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अर्धापूर, भोकर तालुक्यातून दोनशेच्यावर तक्रारी, सर्वसामान्य नागरिकांना मिळतोय न्याय.

अशोक चव्हाण सेवा सेतुमुळे प्रशासन झाले गतिमान, सर्व सामान्यांना आधार

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) : भोकर विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी गेल्या महिण्यात प्रजासत्ताकदिनी (ता. 26 ) सुरु करण्यात आलेल्या अशोक चव्हाण सेवा सेतुचा सर्व सामान्य नागरिकांचे कामे जलद गतीने होण्यास मदत होत आहे. या सेवा सेतुकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी नेते तक्रारी करित आहेत. अर्धापूर तालुक्यातील खैरगांव येथील रमाई घरकुल लाभार्थ्यांचा थांबलेला हप्ता आठ दिवसाच्या आत खात्यावर जमा झाला आहे. या सेतुकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठवून तात्काळ निपटरा करण्यात येत असल्यामुळे प्रशासन गतीमान झाले आहे.

जिल्हाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना मॅनेमेंट गुरु समजले जाते. त्यांच्या नियोजनाचा व जनतेशी संपर्कात राहण्याचा वसा त्यांची कन्या श्रीजया व सुजया चव्हाण यांनी घेतला आहे. लोकांना आपल्या कामासाठी चकरा माराव्या लागू नयेत तसेच वेळ व पैशाची बचत व्हवी यासाठी प्रायोगिक तत्वावर भोकर विधान सभा मतदार संघातील अर्धापूर, भोकर, मुदखेड या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी अशोक चव्हाण सेवा सेतु सुरु करण्यात आले.

हेही वाचा - वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या सेवा सेतुचा शुभारंभ गेल्या महिण्यात (ता. 26) आनलाईन पद्धतीने काॅग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदिपसिंग सुरजेवाला यांच्या हस्ते करण्यात आले होते.या सेतुला गेल्या एक महिन्यात तीन्ही तालुक्यातून दोनशेच्यावर तक्रार प्राप्त झाल्या. यात अर्धापूर तालुक्यात 68, भोकर 72 , मुदखेड 65  तक्रारींचा समावेश आहे. या प्राप्त झालेल्या 205 तक्रारीपैकी 130 तक्रारीचा निपटारा करण्यात आला असून 59 तक्रारीचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच 16 तक्रारी ह्या निधी संदर्भातील आहेत.

अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील साहेबराव गोवंदे यांना रमाई घरकुल योजनेतून घरकुल मिळाले आहे. त्यांनी बांधकाम सुरु केले. त्यांना अनुदानाचा पहिला हाप्ता मिळत नव्हता. त्यानी अशोक चव्हाण सेवा सेतुला तक्रार केली. येथील मुख्य जनसंपर्क अधिकारी एन. जी. पतंगे यांनी अर्धापूर पंचायत सिमला ईमेल केला. त्यानंतर अर्धापूर येथील जनसंपर्क अधिकारी बजरंग खंदारे यांनी पाठपुरावा केला. पुढे काही दिवसातच साहेबराव गोवंदे यांच्या बॅंक खात्यात रक्कम झाली. त्यामुळे साहेबराव गोवंदे यांनी सेवेबदल समाधान व्यक्त केले.

अशी आहे कार्यप्रणाली. 

अशोक चव्हाण सेवा सेतूचे कार्यक्षेत्र भोकर विधानसभा आहे. या सेवा सेतुचा दुरध्वनी क्रमांकावर तक्रार करणा-यांनी आपले नाव, गांव, तालुका, संपर्क क्रमांक सांगावा लागतो. त्यानंतर तक्रारीचे स्वरूप सांगवे लागते. हा पहिला टप्पा झाल्यावर संपर्क अधिकारी संबंधित विभाला ईमेल करून तक्रारीची माहिती देतात. त्यानंतर तालुक्यातील संपर्क अधिकारी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करतात. तसेच झालेल्या कार्यवाहीचा तपशील संबंधित तक्रार कदणा-या देण्यात येतो. या सेतुकडे आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन, बांधकाम, रस्ते, महसुल आदी विभागाच्या तक्रारी येत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image