esakal | अशोक चव्हाण यांच्या दुरदृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा- गोविंदराव शिंदे नागेलीकर

बोलून बातमी शोधा

file photo}

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाने अर्धापूर तालुक्यात कोट्यवधीचा निधी- गोविंदराव शिंदे नागेलीकर.

अशोक चव्हाण यांच्या दुरदृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा- गोविंदराव शिंदे नागेलीकर
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी विकास निधी खेचून आणला. भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तिन्ही तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. ज्या विकास कामांचे भूमीपुजन झाले ती कामे ठराविक वेळेत पुर्ण झाली पाहीजे. तसेच होणारी कामे दर्जात्मक होण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशा सुचना जिल्हा काॅग्रेस कमेटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी सोमवारी (ता. एक) अर्धापूर येथे केले.

शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवास्थानाच्या बांधकामाचे भूमिपजुन करण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेल्या छोटेखानी समारंभात जिल्हाध्यक्ष श्री. नागेलीकर बोलत होते. या बांधकामावर सुमारे तीन कोटी 13 लाख खर्च अपेक्षित असून अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी नऊ निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.

यांचीही होती उपस्थिती

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. यावेळी भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे,  जिल्हासरचिटणीस संजय देशमुख लहानकर, अशोक सावंत, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाने, शेख लायक, डाॅ विशाल लंगडे, अॅड. सचिन देशमुख, मारोतराव गव्हाणे, राजु शेटे, सोनाजी सरोदे, प्रवीण देशमुख, शेख साबेर, आनंदराव कपाटे आदी उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत आहे

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता राजेंद्र बिराजदार यांनी करुन तालुक्यातील सुरु असलेली कामे व प्रस्तावीत कामे याबद्दल माहिती दिली. यावेळी संजय देशमुख लहानकर, मंगाराणी अंबुलगेकर यांनी मार्गदर्शन करुन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या दुरदृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहत आहे. कामे चांगली झाली पाहीजेत अशा सुचना त्यांनी केल्या. या कार्यक्रमाचे आभार उपविभागीय अभियंता विशाल जोपडे यांनी मानले. तर सुत्रसंचलन छत्रपती कानोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभियंता श्री. पतंगे, बालाजी सिनगारे, साहेबराव राऊत यांनी पुढाकार घेतला. यावेळी मुसबीर खतीब, व्यंकटी साखरे, व्यंकटी राऊत, पंडितराव लंगडे, बाळू पाटील, उमेश सरोदे, पिराजी साखरे आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे