हरहर महादेवच्या घोषणेला कोरोनाचे ग्रहण, श्रावण सोमवार काळेश्वर मंदीर भक्ताविना....

प्रल्हाद कांबळे
Monday, 27 July 2020

कोरोनाच्या धास्तीमुळे शिवभक्तांनी आपल्या आराधअय दैवातंकडे पाठ फिरविल्याचे पहायवयास मिळाले.

नांदेड : शहरातील प्रसिद्ध असलेले काळेश्वर मंदीर परिसर आज श्रावण सोमवार (ता. २७) असतांनाही सुनसान दिसून आले. कोरोनाच्या धास्तीमुळे शिवभक्तांनी आपल्या आराधअय दैवातंकडे पाठ फिरविल्याचे पहायवयास मिळाले. या मंदिरासोतच चैतन्य नगर, गाडीपूरा, मुखेड आदी भागातील महादेव मंदीरामध्ये भक्तांची मांदीयाळी नव्हती. 

चैतन्यमय व प्रसन्नताही मोहक निसर्गसंपदा येणे भरभरुन असलेल्या श्रावणाची प्रतीक्षा घराघरात होती. श्रावण मासाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. परंतु यंदा कोरोनाच्या भीतीने सरकारने सर्वच धार्मिक विधीवर बंदी घातली आहे. भाविकांसाठी मठ, मंदिरे, संस्थान बंद ठेवले आहेत. त्यामुळे श्रावणात प्रथमच भाविकाविना मंदिरे सुनी झाली होती. पूजा-अर्चा, अभिषेक, प्रार्थना, भजन, कीर्तन, प्रभू नामाचा गजर सर्वकाही थांबले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचासख्या भावाचा खून करणाऱ्या भावाला पोलिस कोठडी, काय आहे प्रकरण...वाचा ?

यावर्षी देशावर कोरोना वैश्विक महामारीचे संकट

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदने ह्यांच्या वाचून घ्यावे या कविता प्रसिद्ध ओव्या श्रावण महिन्यात गायल्या जातात. पण यावर्षी देशावर कोरोना वैश्विक महामारीच्या संकटाने श्रावणाच्या उत्साही व आनंददायी वातावरणावर विरजण घातले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जनजीवन पूर्णपणे थंडावले असून समाजातील प्रत्येक घटकाला त्रासून सोडले आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्येने आकडा हजाराच्यावर गाठला असून कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने वातावरण चिंतातुर आहे.
 
विविध ठिकाणची महादेवाची मंदिरे भक्तांनी गजबजून जातात

गेल्या चार महिन्यांपासून हिंदू संस्कृतीतील अनेक महत्त्वाच्या सणावर निर्बंध असल्याने मठ, मंदिरे बंद आहेत. अनेक शतकांची पायी वारीची पंढरपूरची परंपरा खंडित झाली आहे. आता सणावाराची सुरुवात श्रावणापासून होत असताना सरकारचे निर्बंध कायमच आहेत. या मासांमध्ये वृत्त, वैकल्य, उपासना पूजापाठ, अभिषेक, भजन-कीर्तन, जागरण मोठ्या प्रमाणावर केले जातात. विविध ठिकाणची महादेवाची मंदिरे भक्तांनी गजबजून जातात. श्रावण सोमवारी तर सर्वच मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी असते. हर हर महादेवचा गजर करीत महिनाभर जलाभिषेक केला जातो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा यंदा कोरोना महामारीमुळे खंडित झाली आहे.

येथे क्लिक कराGood news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट

परंपरा खंडित झाल्याचे दुःख- महादेव भक्त सांगत आहेत

सततच्या संचारबंदीमुळे घरोघरी श्रावणाचा उत्साह दिसून येत नाही. बाजारपेठा बंद असल्यामुळे पूजासाहित्य बेल फुल, विभूती, रुद्राक्ष, माळा, कापूर, अगरबत्ती, दूध, फळे, काजू, बदाम, पिस्ता यासह विविध वस्तूंची विक्री मंदावली आहे. ऐतिहासिकस सांस्कृतिकस प्राचीनस धार्मिक परंपरा असलेली     ठिकाणे जिल्ह्यात अधिक आहेत. पंचक्रोशीतील प्रसिद्ध काळेश्वर मंदीर, मुखेड येथील विरभद्र मंदीर, मरळक येथील इमलेश्वर मंदीर, हदगावचे केदारनाथ मंदीरासह अनेक महादेव मंदीरांमध्ये यावर्षी सर्वत्र शुकशुकाट आहे. श्रावणात आपल्या परिसरातील विविध मन्दिराबरोबरच राज्यातील विविध महादेव मंदिराच्या तीर्थयात्रेसाठी भाविक जात असतात. त्यामुळे भाविकांना हा बेत रद्द करावा लागला आहे. आता पर्यायाने घरोघरी शिव आराधना करावी लागत आहे. श्रावणात अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे कधीही वाटले नव्हते. अनेक वर्षापासून श्रावणात मंदिरांमध्ये हर हर महादेव म्हणत बेलपत्र वाहण्याची परंपरा खंडित झाल्याचे दुःख निश्चितच असल्याचे काही महादेव भक्त सांगत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eclipse of Corona to the proclamation of Harhar Mahadev, Shravan Monday Kaleshwar temple without devotees nanded news