Teakwood Seized : आठ लाखांचे सागवान जप्त, ३० जणांवर गुन्हा दाखल
Illega lWood Trade : चिखली (बु.) परिसरात पोलिस, वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे सागवान तस्करी विरोधात कारवाई केली. यात आठ लाखांची सागवान झाडे जप्त करण्यात आली असून, ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनवट : चिखली (बु.) परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिस, वन, प्रादेशिक परिवहन विभागांनी संयुक्तपणे कोंबिंग ऑपरेशन राबवले. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरारी आरोपी, सागवान तस्कर, वाहन चोर यांची तपासणी करण्यात आली.