Eknath Shinde : नांदेडमध्ये आज सभा; विरोधकांसह महायुतीतील नेत्यांचे लक्ष
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता स्थापनेवर असलेली नाराजी अद्याप दूर झालेली नाही. या नाराजीवर राजकारणात सतत चर्चा सुरूच आहे.
नांदेड : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून राज्यात जे नाराजी नाट्य रंगले, ते राजकारणाच्या इतिहासातील न विसरणारे पान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा अधूनमधून सुरूच असते.