शिवा संघटनेचा ‘रौप्य महोत्सवी वर्धापन दिन’नांदेड शहरात- इंजि. अनिल माळगे

प्रल्हाद कांबळे
Monday, 25 January 2021

गेली 25 वर्षापासून वीरशैव- लिंगायतांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने शिवा संघटना कार्यरत आहे. प्रतिवर्षी 28 जाने. हा दिवस शिवा संघटना ‘स्थापना दिवस’ हा ‘वर्धापन दिन’म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

नांदेड ः शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ही महाराष्ट्रातील वीरशैव- लिंगायतासह बहुजनांच्या सर्वांगिण विकासासाठी ता. 28 जाने 1996 रोजी शिवलिंगेश्‍वर मंदिर सिडको, नांदेड येथे प्रा. मनोहरराव धोंडे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी स्थापन केली. गेली 25 वर्षापासून वीरशैव- लिंगायतांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने शिवा संघटना कार्यरत आहे. प्रतिवर्षी ता. 28 जाने. हा दिवस शिवा संघटना ‘स्थापना दिवस’ हा ‘वर्धापन दिन’म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 

यापूर्वीचे शिवा संघटनेचे वर्धापन दिन हे देशासह विदेशात साजरे करण्यात आले. शिवा संघटनेचा 10 वा वर्धापन दिन भारताच्या राजधानीत दिल्ली येथे मालवणकर हॉल मध्ये पार पडला. तसेच 17 वा वर्धापन दिन 2013 ला श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात हॉटेल ग्लोबल टॉवर या पंचतारांकीत हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. तसेच 21 वा वर्धापन दिन इंग्लडची राजधानी लंडन येथे डब्ल ट्रि बाय हिल्टन या पंचतारांकित हॉटेलमध्ये 28 जाने. 2017 मध्ये मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. शिवा संघटनेचा या वर्षीचा 2021 मधील वर्धापन दिन हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन असल्याने तोही विदेशात साजरा करण्याचे ठरले होते. परंतु कोविडच्या जागतिक महामारीमुळे विदेशातील साजरा करावयाचा वर्धापन दिन रद्द करुन शिवा संघटना स्थापनेच्या जिल्ह्यात नांदेड शहरात करावयाचा ठरला असून ता. 28 जाने 2021 रोज गुरुवारी वेळ दुपारी साडेबारा वाजता मातोश्री मंगल कार्यालय नियोजित म. बसवेश्‍वर पुतळ्याच्या बाजुला, नविन कौठा नांदेड येथे आयोजित केला आहे.

हेही वाचानांदेड - वार्धक्याकडे झुकलेल्या कलामंदीराला आजही कलावंताची प्रतिक्षा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. अमरनाथ राजुरकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु उद्धव भोसले, गोविंद नांदेडे, शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा शेट्टे (पुणे), राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कलवार ( नागपूर ), डॉ. वाय. बी. सोनटक्के ( मुंबई ), राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर ( परभणी ), राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य सरचिटणीस शिवा कर्मचारी महासंघ विठ्ठलराव ताकबिडे, राज्य उपाध्यक्ष शैलेश जक्कापुरे ( पुणे ), भिमाप्पा खांदे, राज्य सरचिटणीस रुपेश होनराव ( नवी मुंबई ), मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, अर्जुन सैदाने यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनास हजारोंच्या संख्येने जय शिवाचा नारा देत उपस्थित राहावे, असे आवाहन रौप्य महोसवी वर्धापन दिन नियोजन समितीचे अध्यक्ष तथा संपर्क प्रमुख इंजि. अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष शिवा संघटना सर्वस्वी संभाजी पाटील, शंकर पत्रे, दिगंबर मांजरमकर, विरभद्र बसापुरे, नंदाताई पाटील, सत्यभामा येजगे, शुभम घोडके, राहुल ममदापुरकर, विजय हिंगमिरे, बाबु पाटील शिवशेट्टे, अनिल मुंडकर, सतीश मठपती, महादेवी मठपती, निळकंठ चोंडे, रविंद्र पांडागळे, शिवाजी कहाळेकर, नरसिंग सोनटक्के, राममिशन पालिमकर, महादेव सोमावार, राम भातांब्रे, गणेश स्वामी, भिमराव वंटे, बालाजी पसरगे, अशोक मजगे, संभाजीराव पावडे, ज्ञानेश्‍वर घोडके, संजय बिराजदार, विजय होपळे, संजय गंजगुडे, माधव मंडलापुरे, बळवंत मंगनाळे, संजय अकोले, आबासाहेब बन्नाळीकर, महेश हांडे, शिवराज भोसीकर, राजु आणेराये, प्रभाकर तमशेट्टे, मनोज शेलगावकर, संजय आणेराये, विलास कापसे, प्रकाश कांचनगिरे, राजेंद्र कुंचेलीकर, सटवाजी चौरे, देविदास टाले, विश्‍वनाथ कोळगिरे, संदिप भुरे तसेच प्रसिद्धीप्रमुख जी. एस. मंगनाळे व वैजनाथ हंगरगे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engi Anil Malge in Nanded city on 'Silver Jubilee Anniversary' of Shiva Association nanded news