
नांदेड : जिल्हयातील नववी ते १२ वीच्या शाळा सुरु झाल्या असुन प्रत्येक शाळेतून विद्यार्थी व शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांसाठी आरोग्य विभागाची मोबाईल टीम तयार करुन चाचण्या करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुगल मिटद्वारे बुधवारी (ता.नऊ) झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती पद्माताई सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाताई बेटमोगरेकर आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होवून ठरावही पास करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात करणे आहे. सद्यस्थितीत खेडोपाडी निर्माण झालेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नामशेष होतात की काय? अशी भिती आहे. बदलत्या स्पर्धेच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शासनस्तावर विविध प्रयत्न सुरु आहेत. परंतु, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
त्यासाठी आता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सेमीसह इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेला आहे. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली असून, प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी मोबाईलटीमची स्थापना करण्यात येणार आहे.
हेही ठराव घेण्यात आले
नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील शौचालयाची सुविधा अद्यावत करणे, नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती करणे, नांदेड जिल्हयातील टप्प्या-टप्प्यांनी ग्राम पंचायतींना आयएसओ मानांकन मिळवणे, जल जिवन मिशन अंतर्गत घर तेथे नळ जोडणी तसेच अंगणवाडी, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आदी महत्त्वाच्या विषयांवर सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.