‘अॅंटी कवच’ रोखणार का कोरोना?

सुनिल पौळकर
बुधवार, 29 एप्रिल 2020


प्रत्येक गावात ‘अॅंटी कोरोना कवच’ समिती स्थापन करण्यात अाली असून या समितीच्या मदतीने पायवाट व इतर मार्गाने गावात येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करून संबंधित गावच्या अध्यक्षांना माहिती दिली जाणार असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून संरक्षण मिळणार आहे. या समितीमध्ये काम करणारे गावातीलच नागरिक असल्याने त्यांनी पायवाट व इतर मार्गेच दगडी पौळ व काटेरी कुंपण टाकून बंद केले असून यामुळे दुसऱ्या गावातून येणारा लोंढा थांबला असल्याचे चित्र बहुतांश गावात दिसत आहेत.

मुखेड, (जि. नांदेड) ः तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊनये म्हणून सावधगिरीचा उपायोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात ‘अॅंटी कोरोना कवच’ समिती स्थापन करण्यात अाली असून या समितीच्या मदतीने पायवाट व इतर मार्गाने गावात येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करून संबंधित गावच्या अध्यक्षांना माहिती दिली जाणार असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून संरक्षण मिळणार आहे. या समितीमध्ये काम करणारे गावातीलच नागरिक असल्याने त्यांनी पायवाट व इतर मार्गेच दगडी पौळ व काटेरी कुंपण टाकून बंद केले असून यामुळे दुसऱ्या गावातून येणारा लोंढा थांबला असल्याचे चित्र बहुतांश गावात दिसत आहेत.

 

हेही वाचा -  नांदेडमध्ये टेन्शन : पंजाबला पळालेले 9 भाविक कोरोनाग्रस्त, दोन राज्यांत गुन्हा दाखल

राज्यशासनाने करोना विषाणूचा (कोविड १९) आजराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रतेक गावात अॅंटी कोरोना कवच-फोर्स समिती स्थापन करण्यात अली आहे. या समितीत अध्यक्ष म्हणून संबंधित गावचे तलाठी आहेत तर सदस्य म्हणून संबंधित गावचे ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल, स्वयंसेवक एनजीओ, एनएसएस, एनसीसीसी हे आहेत, तर सदस्य सचिव म्हणून संबंधित गावाचे पोलिस पाटील हे आहेत.

शहरातून काही नागरिक करत आहेत प्रवेश
तालुक्यातील गावात पायवाट व इतर मार्गाने कोरोना विषाणूबाधित शहरातून काही नागरिक प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी न होता असे लोक गावांतील इतर लोकांमध्ये मिसळल्यामुळे त्यांच्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले उपाययोजनेबाबतचे प्रयत्न निष्पळ होऊन अशा लोकांपैकी कदाचित एखादी व्यक्ती कोरोना विषाणूबाधित असल्यास त्यांच्यापासून समाजाच्या इतर लोकांना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकरता येणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून अॅंटी कोरोना कवच समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

तालुक्यात कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती ठेवण्यासाठी अॅंटी कोरोना कवच समितीची तालुक्यातील प्रतेक गावात समिती गठित केली असून ही समिती प्रतेक गावात बाहेरून येणाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्या वरिष्ठांना माहिती देऊन त्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या समितीची माहिती आॅनलाइन करणे बाकी आहे. 
- कैलास बळवंत, गटविकास अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Establishment of Anti Corona Armor Committee, nanded news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: