
येत्या 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावअंतर्गत शासनाच्या नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने हा शौर्यदिन साजरा करण्यात येणार आहे.
शौर्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार
नांदेड : शौर्यदिनाचे औचित्य साधून शासनाच्या “मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना” प्रमाणपत्र वाटप शुभारंभ येत्या 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादूर्भावअंतर्गत शासनाच्या नियमांचे पालन करत अत्यंत साधेपणाने हा शौर्यदिन साजरा करण्यात येणार आहे.
मालमत्ता कर माफी प्रमाणपत्रासाठीचे अर्ज सैनिक कल्याण कार्यालयात स्विकारण्यात येत आहेत. माजी सैनिकांनी अर्जांसोबत चालू वर्षे 2020 ची मालमत्ता कर पावती व ओळखपत्र छायांकित प्रत जोडून अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत फक्त एकच मालमत्तासाठी माजी सैनिक किंवा पत्नीच्या नावावर असलेली प्रोपर्टीसाठी प्रमाणपत्र अदा करण्यात येईल. माजी सैनिकांनी प्रमाणपत्रासाठी गर्दी व घाई करु नये. अर्ज पोस्टाने किंवा तालूका संघटनेतर्फे एकत्रित आणून दिले, तरीही प्रमाणपत्र माजी सैनिकांना पाठविण्यात येतील असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा वापर टाळा : महावितरणचे आवाहन -
29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता
जिल्हयातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि माजी सैनिकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी सैनिक संघटना अध्यक्ष यांचा सत्कार यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे
भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी
भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तान हद्वीत घुसून सर्जीकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्यांचा खात्मा केला. जम्मु कश्मीर उरी येथे झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली होती. भारतीय सैन्याची ही अभिमानस्पद कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्यदिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.
Web Title: Ex Servicemen Felicitated Occasion Heroism Day Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..