कनेरगाव येथील घरगुती गॅस टाकीच्या स्फोटात चाळीस हजाराचे नुकसान

राजेश दारव्हेकर
Friday, 30 October 2020

कनेरगाव नाका येथील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये जनार्धन कुर्हे यांचे घर आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास ते काम करीत असताना अचानक त्यांच्या कडील भारत गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने मोठा स्फोट झाल्याने घरातील मंडळी घाबरत बाहेर पडली.

हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव येथील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडे अकराच्या सुमारास घरगुती भारत कंपनीच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन यात ३० ते ४० हजाराचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने जिवीत हानी टळली.

कनेरगाव नाका येथील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये जनार्धन कुर्हे यांचे घर आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास ते काम करीत असताना अचानक त्यांच्या कडील भारत गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने मोठा स्फोट झाल्याने घरातील मंडळी घाबरत बाहेर पडली. हा सॉफ्ट एवढा भयंकर होता की, यामध्ये घरातील टीव्ही सह जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. आजूबाजूचे नागरिकानी जनार्धन कुर्हे यांच्या घराकडे धाव घेतली. 

नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविताच तातडीने पोलिस उपनिरीक्षक श्री नंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. लगेच पोलिसांनी तलाठी ग्रामसेवक यांना गॅस स्फोट झाल्याची माहिती दिली. तसेच हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला आग लागल्याची माहिती देताच आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन बंब उशिराने दाखल झाले.

तोपर्यंत आगीत सर्व घरगुती साहित्य जळून खाक झाले होते. अंदाजे ३० ते ४० हजाराचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक  श्री. पाटील यांनी सांगितले. मात्र या स्फोटात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An explosion of a domestic gas tank at Kanergaon has caused a loss of Rs fourty thousand