Nanded Sand Mining : जिलेटिनचा स्फोट घडवून चार बोटी, पाच इंजिन केले नष्ट; वाळू उपसा विरोधात‌ येळी, कौडगावात केली कारवाई, सहा जेसीबी जप्त

Illegal Sand Mining : लोहा तालुक्यातील येळी आणि कौडगाव येथील गोदावरी नदीपात्रात पावसाळ्यातही सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली. ४ फायबर बोटी व ५ इंजिन जिलेटिन कांड्याद्वारे नष्ट करण्यात आले असून, ६ जेसीबी जप्त करण्यात आले आहेत.
Nanded News
Nanded district sand mafia police actionesakal
Updated on

मारतळा : पावसाळ्यातही अवैध वाळूचा उपसा होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी (ता.३१) पोलिस आणि तहसीलदारांसह महसूल कर्मचारी नदीत बोट टाकून येळी व कौडगाव (ता.लोहा) येथील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी, पाच इंजिन जिलेटिन कांड्याद्वारे स्फोट करून इंजिन नष्ट केल्या, तर ६ जेसीबी जप्त करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी शिवकांता पवार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com