
अर्धापूर (नांदेड) : अर्धापूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व नांदेड- यवतमाळ -वर्धा हा रेल्वे मार्ग जात असून या दोन्ही प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. जमिनीच्या मावेजाच्या पोटी कोट्यवधी रूपये मिळत आहे. ही मिळणारी रक्कम वादास कारणीभूत ठरत असून नातेसंबंधात कमालीचा दुरावा निर्माण होत आहे. भाऊ, बहीण, गावातील शेजारी यांच्या प्रेमाच्या संबंधात कमालीची कटुता निर्माण झाली आहे. मिळणा-या रकमेत आपला हक्क मिळावा. यासाठी जवळचे रक्ताचे नातेवाईक, गावातील शेजारी न्यायालय, महसुल अधिकारी यासाठी दावे प्रतिदावे करित आहेत. यातून नातेसंबंधात कमालीचा दुरावा निर्माण होत आहे. पैसा आले तसे भांडण, वाद असे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
असे असले तरी काही बहिणी, भाऊ, शेजारी यांनी नाते संबंधांना महत्त्व देत पैशाला दुय्यम महत्त्व दिले आहे. पैसा, सत्ता, अधिकारी यामुळे काही माणसं जवळ येतात तर काही दुर जातात. या तिन्ही गोष्टींचा उपयोग कसा केला याच्यावर परिणाम अवलंबून आसतो. पैसा नसला तर जवळचे रक्ताचे नातेवाईक दुर जातात तर पैसा असला तर दुरचे नातेवाईक, मित्र जवळ येतात. याचाच प्रत्यय सध्या अर्धापूर तालुक्यात येत आहे.
अर्धापूर तालुक्यातील शेत जमीन राष्ट्रीय महामार्ग 361 व नांदेड- यवतमाळ वर्धा या दोन प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत आहे. नवीन भूमीअधिग्रहण कायद्या प्रमाणे शेत जमिणीसाठी ब-यापैकी मोबदला मिळत आहे. मिळणारी रक्कम ही कोटीत असल्यामुळे यात आपला हिस्सा मिळावा, यासाठी दावे प्रतिदावे होत आहे. वारसा हक्कप्रमाणे वडीलोपार्जित स्थावर व जंगम मालमतेत बहिण भावांचा समान अधिकार असतो. त्यामुळे मावेजाच्या रकमेत आपलल्या हिस्सा मिळावा यासाठी बहिणी दावा करित आहेत. तर वाटणी बरोबर नसेन. शेत एकाच्या नावाने ताबा दुस-याकडे, सामाईक क्षेत्र असणे, प्लॅट खरेदी करून घर बांधले असले तरी जमीन मुळमालकाच्या नावाने असणे अशा अनेक अडचणी निर्माण होत आहेत, अशा परिस्थितीचा काही महाभाग ज्यांना कायद्याचे थोडेबहूत ज्ञान आहे, हे फायदा घेऊन अडचणी निर्माण करित आहेत.
मावेजाच्या रक्कमपायी आपले जीवापाड जपलेले नातेसंबंधात तुटू नयेत, यासाठी भाऊबहिण मनाचा मोठेपणा करित सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करित आहेत.तर काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे. तर काहींनी हक्काचे पैसे देण्यासाठी नकार दिल्याने वादाच्या ठिणग्या पडत आहेत.
शेतजमिनीच्या मावेजाच्या रक्कमेत जर हिस्सा दिला तर माहेराला कायमचे मुकावे लागेल, नातेसंबंध तुटतील, सणाला, मंगल सोहळ्यास आमंत्रण नाही असे ठणकाऊन सांगण्यात येत आहे तर हे होवू नये यासाठी भाऊबहिण समन्वय ठेवून मार्ग काढत आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.