Bear Attack : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ८ गंभीर

वन विकास महामंडळाच्या परिक्षेत्रालगत असलेल्या दयाळ धानोरा शिवारात नऊ शेतकऱ्यांवर अस्वलाने केला हल्ला.
Bear Attack on Farmers

Bear Attack on Farmers

esakal

Updated on

ईस्लापूर (जि. नांदेड) - वन विकास महामंडळाच्या परिक्षेत्रालगत असलेल्या दयाळ धानोरा (ता. किनवट, जि. नांदेड) शिवारात नऊ शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला असून, आठ जण गंभीर झाले आहेत. मंगळवारी (ता. १०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. दत्ता बळिराम जाधव (वय ५५, रा. दयाळ धानोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com