नैसर्गिक वीज पडून शेतकरी ठार तर दोघे गंभीर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 16 September 2020

किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात एका आखाड्यावर नैसर्गीक वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार तर सोळा वर्षीय मुलगी व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) रोजी घडली. 

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडाटामुळे पाऊस पडला. या पावसाताच किनवट तालुक्यातील निचपूर शिवारात एका आखाड्यावर नैसर्गीक वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार तर सोळा वर्षीय मुलगी व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) रोजी घडली. 

किनवट तालुक्यातील नीचपुर शिवारात सूर्यकांत सुदाम डोईफोडे (वय ३८) व त्यांची पत्नी सिंधुबाई सूर्यकांत डोईफोडे (वय ३४) हे मंगळवारी सकाळी आपल्या शेतावर काम करण्यासाठी गेले होते. मात्र अचानक सुरु झालेल्या पावसाने त्यांनी विसावा म्हणून शेतातील आखाड्यावर गेले. तसेच त्यांच्या शेतालगत शेत असलेल्या माधव लोखंडे यांची मुलगी कांचन लोखंडे (वय १६) ही सूर्यकांत डोईफोडे यांच्या आखाड्यावर आसऱ्यासाठी आले होती. 

हेही वाचा -  मुदखेड शहरात जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद, शहर १०० टक्के बंद -

किनवटचे तहसीलदार उत्तम कागणे यांची भेट

या दरम्यान भर पावसातच आखाड्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत शेतकरी सूर्यकांत डोईफोडे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. तर सिंधुबाई डोईफोडे व कांचन लोखंडे या दोघी गंभीर भाजल्या गेल्या. या घटनेची महिती त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी शेताकडे धाव घेतली. सर्वात अगोदर जखमींना गोकुंदा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हे वृत्त समजताच तहसीलदार उत्तम कागणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची भेट घेऊन पाहणी केली.

किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद 

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून मिळणाऱ्या चार लाख रुपये नुकसानभरपाईची मदत तातडीने देण्याचे श्री. कागणे यांनी जाहीर केले. यावेळी किनवट पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांनीही आपले सहकारी नारायण संदुपटलावार यांना घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरुन किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जखमी कांचन लोखंडे व सिंधुबाई डोईफोडे यांच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer killed by natural lightning, both seriously nanded news