
Nanded Flood
sakal
मुक्रमाबाद : माय बाप सरकार... शेत वाहून गेलं...घरात नदी येऊन माहेरवासीन सारखी खेळून हाय, नाय ते सोबत घेऊन गेली...घरात अन्नाचा कणही ठिवला नाही... चूल विझली... दावणीला बांधलेली गुरंढोरं, वाहून गेली...आयुष्याची दोरी झाडावर आडकली... तर काहीचा वीज पडून कोळसा झाला... आता काय शिल्लक राहिलं नाय... सरकार मदतीच्या नावाखाली आमची चेष्टा करत आहे... आम्हांला या संकटातून वाचवा अशा टाहो शेतकरी फोडत आहेत.