पेरणी जवळ आल्याने शेतकरी बैलजोडीच्या शोधात; बाजार बंदमुळे तारांबळ

निसर्गाच्या लहरीपणावर येथील शेतकरी आपले जीवन जगत आहे. कधी जास्त तर कधी अपुऱ्या पावसाने शेतीचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे येथील शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहे.
शेतकरी बैलजोडींच्या शोधात
शेतकरी बैलजोडींच्या शोधात

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी परीसराततील (Kinwat shivani area) शेतक-याकडे मोठ्याप्रमाणात कोरडवाहु जमीन असल्यामुळे त्याना वर्षभर शेतीत कामे नसतात. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजांच्या जीवनामध्ये होणारा आर्थिक चढ- उतारावर अनेक कास्तकाराच्या वार्षिक व्यवहाराचे (Early planing) नियोजन असल्याने बहुतांश शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी चार महिन्यात हंगामापुरते बैलजोडीचा वापर करणारे शेतकरी बैलांच्या शोधात आहेत. मात्र लाँकडाऊनमुळे (Lockdown) बाजार बंद असल्याने अनेक शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी गावोगावी भटकंती करुन चढ्या दराने बैलजोडी खरेदी करताना दिसत आहे. (Farmers- in- search- of- oxen- as- sowing -due- to -market closure)

निसर्गाच्या लहरीपणावर येथील शेतकरी आपले जीवन जगत आहे. कधी जास्त तर कधी अपुऱ्या पावसाने शेतीचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे येथील शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहे. आपले आर्थिक व्यवहार भागविण्यासाठी आपल्याकडील पाळीव पशुधन विक्री करुन त्यातून मिळण्याऱ्या पैशात आपल्या दैनंदिनी गरजा भागविण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हंगामी शेतीकामांना लागणारे बैलजोडी घेवून कामे करीत असतात. संध्या लॉकडाऊनमुळे शिवणी, हिमायतनगर, वाळकी, पाळजसह तेलंगणा राज्यातील भैन्सा व निर्मलसह सर्वच बैल बाजार बंद आहेत. ऐन मृग नक्षत्राच्या तोंडावर शेती कामासाठी बैलजोडी नसल्याने ती खरेदी करण्यासाठी आता बहुतांश शेतकरी गावोगावी फिरुन चढ्या दराने खरेदी करत आहेत.

हेही वाचा - गंगाखेडचे वास्तूवैभव भग्नावस्थेकडे; पुरातन विभागाचे दुर्लक्ष

यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा बैल दलालाची चांदी होताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे बैल खरेदी करताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

पेरणीपूर्वी मशागतीची कामे सध्या आधुनिक यंत्राच्या सहाय्याने करीत असले तरी पावसाळ्यात मात्र शेती कामे ही बैलजोडीशिवाय पर्याय नसल्याने आता बहुतांश शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडून वाटेल त्या किमतीत खरेदी करीत आहेत. या भागातील शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी शिवणी, हिमायतनगर, भैन्सा या बाजारपेठेत जात होते परंतु लाॅकडाऊन असल्याने सद्या सर्वच बाजार बंद असल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली आहे.

शेतकरी वर्ग यावर्षी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बैलाचे भाव वाढले, बियाण्याचे, खताचे भावतर वाढले त्यात डीझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे शेती काम नांगरटी, रुटर, पेरणीचे सुध्दा भाव वाढले असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी बियाणे महागामोलाचे खरेदी करुन कोरडवाहू शेतीत उत्पन्न कसे व किती वाढावे या चिंतेने शेतकरी हैराण झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com