Crop Loss: कौठा शिवारातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी आणि पुराने शेती खरडून गेल्यानंतरही महसूल विभागाने योग्य पंचनामे न केल्याची तक्रार आहे. शेतकऱ्यांनी चौकशी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
कंधार : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पुराने मन्याड नदीसह परिसरातील नाल्यांना पूर आला, ज्यामुळे कौठा शिवारातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.