शेतकऱ्यांनी पिकांची फवारणी करताना काळजी घ्यावी- तहसीलदार जीवराज डापकर  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विशेष काळजी सुरक्षा किट वापरून फवारणी करावी व आपल्या शरीराची काळजी घ्यावी असे प्रतिपादन लिंगापूर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद आयोजित बळीराजा सुरक्षा अभियान व शेतकरी प्रशिक्षण शिबिरमध्ये .

शेतकऱ्यांनी पिकांची फवारणी करताना काळजी घ्यावी- तहसीलदार जीवराज डापकर 

नांदेड :  शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची फवारणी करताना विशेष काळजी सुरक्षा किट वापरून फवारणी करावी व आपल्या शरीराची काळजी घ्यावी असे प्रतिपादन लिंगापूर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद आयोजित बळीराजा सुरक्षा अभियान व शेतकरी प्रशिक्षण शिबिर मध्ये अध्यक्षीय भाषणमध्ये बोलताना हदगावचे तहसीलदार जीवराज डापकर यांनी व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी दिगांबर तपासकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी आर.डी रणवीर,तामसा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, मंडळ अधिकारी श्री बिराडे,मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव,धानुका पेस्टिसाइडचे विभागीय व्यवस्थापक सुरज देशमुख,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार, ज्ञानोबा गायकवाड,पांडुरंग पोपळे, गजानन पाटील कदम,आत्माचे तंत्र व्यवस्थापक सतीश पाटील खानसोळे, गजानन पाटील जाधव वाटेगावकर, आयोजक भागवत देवसरकर व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा -  नांदेड : कसा गोड बोलून गळा कापियला, मावेजासाठी बाधीत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया -

आवश्यक त्या गोष्टी परिधान करूनच पिकाला फवारणी करावी

यावेळी पुढे बोलताना जीवराज डापकर यांनी शेतकऱ्यांना पिकाच्या फवारणी बाबत माहिती देऊन विशेष काळजी घेऊन आपल्या आरोग्याची जपणूक करावी सुरक्षा किट व इतर आवश्यक त्या गोष्टी परिधान करूनच पिकाला फवारणी करावी असे आवाहन यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर, सुरज देशमुख, दिलीप जाधव यांनी विस्तृत मार्गदर्शन केले, यावेळी कार्यक्रमाला सर्व उपस्थित शेतकऱ्यांना फवारणीच्या सुरक्षा किट वाटप करण्यात आले. 

यांची होती उपस्थिती 

कार्यक्रमाला परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी भगवानराव कदम, विलास माने, अविनाश कदम, शेख रहीम, नागेश कदम, ज्ञानेश्वर देवसरकर, निरंजन देवसरकर, अनिल देवसरकर, अमोल देवसरकर, लक्ष्मणराव पवार, आनंद शिंदे, गजानन कंठाळे, सतीश शिंदे, अविनाश पवार, विठ्ठल पवार, शरद पवार, गजानन देवसरकर, संदीप जाधव, नंदू पाटील, अमोल वाघीकर, साईनाथ कोल्हे यांच्यासह छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शेतकरी उत्पादक कंपनी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Farmers Should Be Careful While Spraying Crop Tehsildar Jivraj Dapkar Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top