esakal | बाप-लेकीवर काळाचा घाला...
sakal

बोलून बातमी शोधा

accident

बाचोटी येथुन लग्न आटोपून घुंगराळ्यात येताच दुचाकीस भंगार घेऊन नांदेडला जाणाऱ्या भरधाव ट्रकने उडवल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

बाप-लेकीवर काळाचा घाला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बरबडा ः बाचोटी येथुन लग्न आटोपून घुंगराळ्यात येताच दुचाकीस भंगार घेऊन नांदेडला जाणाऱ्या भरधाव ट्रकने उडवल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीला नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी (ता.सात) सायंकाळी पाच वाजता घुंगराळा बसस्थानकावर घडली.


नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील बालाजी शिताराम सुगावे (वय ४०) नातेवाईकाच्या लग्नासाठी पत्नी संगीता बालाजी सुगावे (वय ३५), रूतुजा बालाजी सुगावे (वय १३) हे तिघे मोटारसायकल क्र (एमएच.२६ एए ६८४) यावर बाचोटी येथील लग्न आटोपून घुंगराळा बसस्थानकावर येताच नायगाव येथुन भंगार घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक क्र. (एमएच. २६ एच. ८७२४) याने दुचाकीस जोराची धडक दिल्याने बालाजी शिताराम सुगावे व त्यांची १३ वर्षाची मुलगी रूतुजा बालाजी सुगावे या बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा - खतगांवकरांकडून पुतण्याचा पत्ता कट, तर सुनेला बढती..

भंगार घेऊन जाणारा ट्रक अति वेगात
भंगार घेऊन जाणारा ट्रक हा अति वेगाने जात असल्याचे उपस्थितांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही मृतदेह कुंटुर पोलिसांनी उतरीय तपसणीसाठी नायगाव ग्रामीण रूग्णालयात नेले. यातील गंभीर जखमी संगीता सुगावे यांना उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले. ट्रक चालकास कुंटुर पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुंटुर पोलिस ठाण्यात सुरू होती. 

हेही वाचा - विनाअनुदानित शाळांचे शिक्षक हवालदिल, कशामुळे? ते वाचलेच पाहिजे

खानापूर येथे जुगार अड्ड्यावर छापा, अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा 
देगलूर ः तालुक्यातील खानापूर येथे एका शेतात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १२ हजार रुपये व चार मोटारसायकली जप्त केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील आठ जणांना रात्री उशिरा जामिनावर सोडण्यात आले, तर पाच आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. खानापूर येथील गावालगत असलेल्या कारले पाटील यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपनिरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या टीमने शनिवारी (ता.सहा) छापा मारून ११ हजार रुपये ९५० रुपये व चार मोटरसायकली जप्त करून माधव यनलवार, सतीश बामणे, नरेश बेलबुट्टे, सय्यद हबीब, सय्यद शादुल, बालाजी यमुनवाड, अजित बक्कनवार, संदेश ठिगळे यांना अटक केली, तर इतर पाचजण फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कंधारे करीत आहेत.