मुलाकडून पित्याचा खून, मारहाणीमध्ये आई गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खून

मुलाकडून पित्याचा खून, मारहाणीमध्ये आई गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निवघा बाजार : निराधार योजनेचे मिळालेले मानधन मला का देत नाही, या कारणावरून मुलाने जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना तळणी (ता. हदगाव) येथे सोमवारी (ता.२२) सांयकाळी घडली.

माधव दशरथ घंगाळे (वय ७०) हे तळणी येथे पिठाची गिरणी चालवून संसार चालवतात. माधव घंगाळे यांना अर्धांगवायू झाल्याने ते घरीच राहतात. त्यांना व त्यांच्या पत्नीला निराधार योजनेचे मानधन मिळाले होते. त्यांचा मुलगा संजय घंगाळे याला दारूचे व्यसन होते. निराधार योजनेतून मिळालेले पैसै दारू प्यायला द्या, म्हणत त्याने आई-वडिलांशी वाद घातला. रागाच्या भरात संजयने वडिलांना जबर मारहाण केली.

त्यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. मारहाणीत आईसुद्धा गंभीर जखमी झाली. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना माधव घंगाळे यांचा वाटेतच मृत्यू झाला.त्यांच्या पत्नीवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयितास अटक केल्याची माहिती जमादार बालाजी सातपुते यांनी दिली.

loading image
go to top