अगोदरची कोरोनाची भिती, त्यात मोकाट जनावरांचा संचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

नांदेड शहराच्या अबचलनगरमध्ये कोरोनामुळे नागरिक हैरान असतांना दुसरीकडे मोकाट जनवारांचा हैदोस.

नांदेड : येथील अबचलनगर कॉलनीमध्ये मागील दोन आठवड्यापासून मोकाट जनावरे हैदोस घालीत असून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. सध्या अबचलनगर हे कन्टेनमेंट झोन आहे. या ठिकाणी बंद असतांना एवढ्या मोठ्या संख्येत मोकाट जनावरांचा वार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

ता. २६ एप्रिल रोजी अबचलनगर कॉलनीला कन्टेनमेंट झोन घोषीत करण्यात आले. प्रवेशद्वारावार पोलिसांचा कडक पहारा आहे. असे असतांना देखील अनेकांनी आपले पाळीव जनावरे जैसे गाय, म्हशी, गाढव, डुकरे आणून सोडली की काय असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. ज्यात गायी, बैल, गाढव व इतर जनवारांचा समावेश आहे. या जनावरांना झोनच्या बाहेर पाडण्यासाठी मार्ग सापडत नसल्याने वरील जनावरे मोठा हैदोस घालीत आहे. दिवस- रात्रं ओरडून व एकमेकांशी झुंज घालून मोठा गोंधळ ते घालीत आहेत. येथील रहिवाशी सध्या अनेक समस्यांशी सामना करीत आहेत त्यात मोकाट जनावरांचा हैदोस पाहून नागरिक वैतागले आहे. दोन आठवड्यापूर्वी जनावरे नव्हती ती कशी आली. शहर प्रशासनाने वरील जनावरे जप्त करून अबचलनगरमध्ये शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. 

हेही वाचा खळबळजनक : साधूसह शिष्याच्या हत्येने नांदेड हादरलं

स्वस्त धान्याच्या कारणावरून मारहाण

नांदेड : स्वस्त धान्य दुकानदाराने आलेल्या ग्राहकांना मारहाण केल्याची घटना चिखलवाडी परिसरात शनिवारी (ता. २३) दुपारी घडली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखलवाडी परिसरात उमाकांत पांडूरंग बच्चेवार यांचे स्वस्त धान्य वितरणाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर सचीन टिकाराम औसेकर (वय ५०) हे धान्य घेण्यासाठी गेले होते. परंतु दुकानमालकाने संगनमत करून तुझे राशनकार्ड आॅनलाईन झाले नाही. म्हणून तुला राशन मिळणार नाही. असे म्हणून त्यांच्यात वाद झाला. यावेळी उमाकांत बच्चेवार यांनी आपल्या दोन साथिदारांच्या मदतीने सचीन औसेकर यांना मारहाण केली. यानंतर श्री. औसेकर यांनी वजिराबाद पोलसि ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी उमाकांत बच्चेवार व त्याच्या दोन साथीदारावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. निरडे करत आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of the previous corona, the movement of moccasins in it nanded news