esakal | नांदेड जिल्ह्यात अखेर उपस्थिती भत्ता आणि पोषण आहाराचे वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्याचे तसेच शालेय पोषण आहारांचे वाटप शाळांनी सुरु केले आहे.

नांदेड जिल्ह्यात अखेर उपस्थिती भत्ता आणि पोषण आहाराचे वाटप 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  जिल्ह्यातील शाळांना दुर्बल घटकातील इयत्ता पहिली ते चौथीमधील मुलींना देण्यात येणारा उपस्थिती भत्त्याचे सर्व शाळांतून वाटप करण्यात आले. तसेच उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे धान्यही काही शाळांना मिळाले नव्हते. शेवटच्या टप्प्यात सर्व अप्राप्त शाळांना धान्य मिळाले आहे. त्याचेही वाटप सुरक्षिततेचे नियम पाळून करण्यात आले. 

जिल्ह्यातील शाळांना उन्हाळी सुट्टीतील एकूण ३४ दिवसांचा तांदूळ, हरभरा आणि मूगदाळ यांची सीलबंद पाकिटे असा आहार पटसंख्येच्या प्रमाणात प्राप्त झाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी तीन किलो चारशे ग्रॅम, मूगदाळ सहाशे ग्रॅम, हभरा एक किलो दोनशे ग्रॅम असे प्रमाण आहे. तसेच सहावी ते आठवीतील उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी तांदूळ पाच किलो शंभर ग्रॅम, मूगदाळ नऊशे ग्रॅम, हरभरा एक किलो आठशे ग्रॅम अशा प्रमाणात सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. शिवाय शाळेतील दैनंदिन उपस्थितीबाबत दररोज एक रुपया याप्रमाणे गतवर्षीच्या उपस्थितीवरुन पात्र लाभार्थी असलेल्या विद्यार्थिनींना या उपस्थिती भत्त्याचे वाटप करण्यात आले. 

हे वाचा - नांदेड - कोरोनाचे ७५ टक्के रुग्ण धोक्याबाहेर , शुक्रवारी २४७ रुग्ण बरे, २३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. १५ मार्च ते १५ एप्रिल पर्यंतचा शालेय पोषण आहार यापुर्वीच वाटप करण्यात आला आहे. तसेच शिल्लक मालापैकी खाण्यायोग्य मसुरदाळ, वाटाणा, हरभरा, मटकी या कडधान्यासह मसाला, मीठ, हळद, जिरे, मोहरी, सोयाबीन तेल आदी जिन्नसही समप्रमाणात नुकतेच वाटप करण्यात आले. यानंतरही पाकिटांच्या स्वरुपातच शालेय पोषण आहार देण्यात यावा अशी मागणी पालकांतून होत आहे. 

हे देखील वाचाच - तरुणाचे स्टार्टअप ! हुडलरमुळे ज्येष्ठांची थांबली धावपळ

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील शालेय विद्यार्थिनींना नियमित शाळेत उपस्थित राहण्यासाठी दैनंदिन एक रुपया भत्ता देण्याचा निर्णय जानेवारी १९९२ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर अनुसूचित जमातींमधील आश्रमशाळेतील मुलींसाटीही हा भत्ता लागू करण्यात आला. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून हा भत्ता देण्याचा मुख्य हेतू आहे. मात्र, २८ वर्षानंतरही या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. हा भत्ता वाढवावा अशी मागणी शैक्षणिक वर्तुळासह पालकांमधून होत आहे.

हेही वाचाच - शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला किनवटमध्ये प्रतिसाद

कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे यंदा नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांविनाच सुरु झाले. त्यामुळे गतवर्षीचा उपस्थित भत्ता लाभार्थी विद्यार्थिनींना वाटप करता आले नाही. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दोन दिवसांपासून लाभार्थी विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्यासह शालेय पोषण आहाराचेही वाटप करण्यात येत आहे.

loading image
go to top