अखेर शिधापत्रिका नसलेल्यांना मिळाला आधार....कसा तो वाचा 

NND12KJP01.jpg
NND12KJP01.jpg

नांदेड  : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत, अशा नागरिकांना धान्य वाटप सुरु झाले आहे. जिल्ह्यातील ४२ हजार ५५ कुटूंबातील दोन लाख २४ हजार ५५८ व्यक्तींना मे व जून या दोन महिन्याकरिता प्रति व्यक्ती प्रतिमाह ५ किलो तांदूळ व एक किलो हरभरा जिल्ह्यात मोफत वाटप होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातून देण्यात आली.  

विना शिधापत्रिकाधारक धान्यपासुन होते वंचित 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात अन्नधान्नचा लाभ देण्यात आला आहे. तथापी या योजनेत विनाशिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला नाही. तसेच आंतर राज्यातील विस्थापित कामगार, आर्थिक दुर्बल घटक, सुद्धा या योजनेच्या लाभप्राप्ती पासून वंचित राहिले होते. दरम्यान लॉकडाउन काळात मनुष्य बळाच्या अभावी अन्न धान्य वितरण कार्यालयाकडे नवीन शिधापत्रिकांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने अनेक विना शिधापत्रिका धारकांना कोरोना संकट काळात स्वस्त व मोफत धान्य मिळणे दुरापास्त झाले होते. 

४२ हजार ५५ कुटूंबाकडे नाहीत शिधापत्रिका
जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांचा सर्वे करण्यात आला. यात ४२ हजार ५५ कुटूंबाकडे शिधापत्रिका नसल्याची माहिती प्राप्त झाली. या कुटूंबातील दोन लाख २४ हाजर ५५८ नागरिकांना दोन महिन्यासाठी लागणाऱ्या तांदूळ व हरभरा धान्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी केली होती. यानुसार ११ तिार ३८० क्विंटल तांदुळ तर ४२० क्विंटल हरभरा प्राप्त झाला आहे. हे धान्य रास्त दुकानदारांना वितरीत केल्याने मागील दोन दिवसापासुन धान्याचे वाटप सुरु असल्याची माहिती मिळाली. 

योजनेच्या लाभासाठी असलेले निकष 
ज्यांनी राष्र्टीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्याप पर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेली व्यक्ती, अन्नधान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व रोजंदारी मजूर, त्याच बरोबर शिधापत्रिका प्राप्त न झालेले प्रलंबित लाभार्थी, या सर्वांना हा लाभ मिळणार आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांना यातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. 

पाच किलो तांदूळ व एक किलो हरभरा  
लाभार्थ्यांना आपले आधारकार्ड कोणत्याही शिधापत्रिकेसोबत संलग्नित नसल्याची खातरजमा करून रास्त भाव दुकानदार त्या लाभार्थ्यास देय असलेले धान्य मोफत देईल. किंवा शासनाकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र पाहून त्याची स्वतंत्र नोंद घेऊन सदर विनाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्याला ऑफलाईन धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यांना माहे मे व जून या दोन महिन्याचे एकत्रित पाच किलो मोफत तांदूळ प्रति व्यक्ती तसेच एक किलो अख्खा हरभरा प्रति कुटुंब असा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. 

इ-पॉस व इजी ॲपव्दारे होणार तपासणी
या योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांना यातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. परंतु शिधापत्रिका नसलेल्या यादीत ज्यांनी नोंदणी केली आहे, अशा लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा इ-पॉस व इजी ॲपवर तपासण्यात येणार आहे. यात त्यांचे नाव आढळून आल्यास त्यांना या योजनेतुन धान्य देण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com