हिवाळी अधिवेशनात झालेल्या बदलामुळे शिल्लक राहणाऱ्या निधीतून दिव्यांगांना अर्थसहाय्य करा - राहुल साळवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार दिव्यांगांना दिवाळि भेट म्हणून अर्थसहाय्य करावी अशी मागणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

हिवाळी अधिवेशनात झालेल्या बदलामुळे शिल्लक राहणाऱ्या निधीतून दिव्यांगांना अर्थसहाय्य करा - राहुल साळवे

नांदेड : सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दरवर्षी नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन यावर्षी मुंबई येथे अल्पकालावधीत पार पडणार आहे त्यामुळे दरवर्षी या अधिवेशनावर होणा-या एकुण कोट्यवधी रुपयांतुन हि मोठ्या प्रमाणावर निधी शिल्लक राहणार आहे त्यामुळे हा शिल्लक राहत असलेला निधी नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार दिव्यांगांना दिवाळि भेट म्हणून अर्थसहाय्य करावी अशी मागणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना या महामारीमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला होता या लाॅकडाऊनमुळे गत ७ महिन्यांपासून बेरोजगार दिव्यांगांचे हातचे रोजगार जाऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट ओढावत उपासमारीची वेळ आली आहे. या लाॅकडाऊन काळात केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारांनी बेरोजगार दिव्यांगांसाठी कुठलीच आर्थिक मदत देऊ केली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थां आणि नागरी स्वराज्य संस्थांकडील राखिव निधी असेल की आमदार, खासदार यांच्याकडील राखीव निधी असेल या लाॅकडाऊन काळात अद्याप खर्च करण्यात आला नाही.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात २८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

परीणामी बेरोजगार दिव्यांगांना लोकशाही मार्गाने विविध आंदोलने करावी लागली. परंतु न्याय न मिळता केवळ आश्वासनांचा पाऊसच पडला. एरवी दिव्यांगांच्या बाबतीत मोठ मोठ्या गर्जना करणारे सरपंच असेल नगरसेवक असेल किंवा आमदार/खासदारांसह ईतर मंत्री असतील त्यांना हि दिव्यांगांचा विसरच पडल्याचे दिसते.केंद्र शासनाकडून मार्च महिण्यात तीन महिने वाढिव मानधन दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे दिव्यांगांना देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी घोषित केले होते परंतु ते ही वाढीव मानधन नांदेड जिल्ह्यातील एकाही दिव्यांगांला मिळाले नाही. हाच आहे का समान संधी व संपुर्ण सहभाग कायदा कारण जोवर शासन स्तरावरून येणाऱ्या विविध विकास निधीत बेरोजगार दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी ५ टक्के निधीची तरतूद केली जाणार नाही.

येथे क्लिक करा - नांदेड : आधी सन्मान, नंतर अपमान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसुलीस सुरुवात

तोवर बेरोजगार दिव्यांग हा समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही असे राहुल साळवे यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की.दिवाळr हा सन जवळ येत आहे. आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी आंध्रप्रदेश/कर्नाटक आणि दिल्लीच्या धर्तीवर निराधारांचे मानधन दुप्पट करुन निराधार मानधन दिवाळीपुर्वी वितरीत करण्याचे आदेशीत करावे अशी सुद्धा मागणी राहुल साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे एका निवेदनाद्वारे कळविले आहे. या निवेदनावर अमरदिप गोधने, नागनाथ कामजळगे,आनंदा माने, प्रदिप गुबरे आणि अब्दुल माजीद शेख चांद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Financially Help Disabled Remaining Funds Due Change Winter Session Rahul Salve Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top