esakal | जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्यांना ७७ हजाराचा दंड   
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परवानगी पेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या २४८ वाहनधारकांकडून ७६ हजार ८०० रुपयांचा दंड

जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्यांना ७७ हजाराचा दंड   

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात ता. आठ ते ता. १० जुलै दरम्यान वाहतुकीमध्ये परवानगी पेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या २४८ वाहनधारकांकडून ७६ हजार ८०० रुपयांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी मोहिमेतील दोन पथकांमार्फत वसूल करण्यात आला आहे.   

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात “मिशन ब्रेक द चेन” अंतर्गत आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशाची जिल्हाभर कडक व काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. तसेच दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्‍क परिधान न केल्यास व  सामाजिक अंतराचे पालन न केल्यास दंड ठोठावला जात आहे.

हेही वाचासंचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर

जनतेने कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. जनतेने कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, कुठल्याही प्रकारची शंका, भिती मनात न बाळगता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध

नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील. त्याव्यतिरिक्त बँकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणत्याही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध केला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत 

याचबरोबर मान्सुन संबंधित कामे पुर्ण करण्यासाठी यापुर्वी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून उक्त कामे चालू ठेवण्यास मुभा राहिल. कोणतेही खाजगी दुचाकी, तिनचाकी, चारचाकी व इतर वाहनाद्वारे व्यक्तींना प्रवासास बंदी राहिल. परंतू अत्यावश्यक वैद्यकिय कारणासाठी तसेच परवानगी प्राप्त असलेल्या राज्याअंतर्गत, अंतरराज्य प्रवासाच्या वाहतुकीस मुभा राहिल. सदर अतिरिक्त व सुधारित आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.