esakal | फायरींगने नांदेड पुन्हा हादरले; मिल्लतनगर भागात जबरी चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडमध्ये फायरींग

फायरींगने नांदेड पुन्हा हादरले; मिल्लतनगर भागात जबरी चोरी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : बचत गटाच्या मिटींगनंतर आपल्या कार्यालयाकडे जाणाऱ्या एका युवकावर पिस्तुलातून गोळीबार करुन त्याच्याकडील ५७ हजाराची जबरीने लुट केल्याची घटना शहराच्या मिल्लतनगर भागात मंगळवारी (ता. १५) रोजी घडली. या घटनेनंतर नांदेडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून हल्लेखोरांच्या शोधात पोलिस पथक कार्यरत करण्यात आलेत.

बचतगटाची मिटींग संपवून जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन दरोडेखोरांनी मारहाण करुन, बंदुकीतून फायरींग करून त्याच्याजवळील 57 हजार रुपये लुटल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी 10 वाजता मिल्लतनगर भागात घडला आहे.

हेही वाचा - अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण; प्रतिक्षा उद्घाटनाची

रोहित गुगले हे क्रेडीट ऍक्सीस ग्रामीण लि. मध्ये केंद्र व्यवस्थापक आहेत. सकाळी आठ वाजता एका बचगटाच्या मिटिंगसाठी गेले होते. तेथून बचत गटाचे 57 हजार रुपये घेवून आपल्या दुचाकीने परत जात असतांना मिल्लतनगर भागात त्यांच्या पाठीमागून दोन जण दुचाकीवर आले आणि त्यांनी आपले तोंड पुर्णपणे बांधून ठेवलेले होते. रोहित गुगलेच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी उभी करुन त्यांच्या दुचाकीची चाबी काढून घेतली. त्याच्या तेथे एका भिंतीवर गावठी कट्यातून फायरींग केली आणि रोहितकडील 57 हजार रुपयांची बॅग बळजबरीने चोरुन नेली आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, पोलिस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे साहेबराव नरवाडे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती घेवून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा सुर्यप्रकाशाच्या उजेडात फायरींग करुन झालेली ही लुटीची घटना नक्कीच चिंता तयार करणारी आहे. इतवारा पोलिस याबद्दलची माहिती जमा करत आहेत.

loading image