esakal | अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण; प्रतिक्षा उद्घाटनाची
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर येथील रुग्णालय

अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या ईमारतीचे बांधकाम पूर्ण; प्रतिक्षा उद्घाटनाची

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले बांधकाम तब्बल आठ वर्षांनी पुर्ण झाले आहे. या रुग्णालयात पदस्थापना झाली असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्ती, फर्नीचर, वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, संरक्षक भिंत आदी काम शिल्लक आहेत. ही बाकी राहिलेले काम लवकर पुर्ण करुन रुग्णालय कार्यान्वित करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्वरीत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे अशी नागरीकांची भावना आहे.

अर्धापूर तालुका कार्यान्वीत होवून 21 वर्षे झाली आहेत. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, शहरी भागात नागरी व उपजिल्हा रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करण्याचे शासनाचे धोरण आहे. तालुका अस्तित्वात येवून दोन दशके झाली तरी शहरात ग्रामीण रुग्णालय नव्हते. शहराची लोकसंख्या, अपघाताच्या घटना, अपुरे कर्मचारी व अधिकारी अशा अनेक समस्यांमुळे नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नव्हते.

हेही वाचा - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी शहरातील नागरिकांची खूप वर्षापासूनची मागणी होती. शहराची गरज लक्षात घेवून 2013 बांधकामाचे भूमीपजन करण्यात आले होते. या ईमारतीचे बांधकाम कसेबसे पूर्ण झाले आहे. हे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण सातत्याने पाठपुरावा करुन जातीने लक्ष घालत आहेत.

आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या ईमारतीचे बांधकाम, रंगरंगोटी, लाईट फिटिंग, नळफिटींग, दारं, खिडक्या आदी कामे पूर्ण झाली असून ईमरात उद्घाटनाला सज्ज झाली. रुग्णांच्या अनुषंगाने लागणारे वैद्यकीय उपकरणे, साहित्य, फर्नीचर, डी. पी., संरक्षक भिंत आदी कामे शिल्लक आहेत. तसेच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करणे आदी कामासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

येथे क्लिक करा - लसीकरणासाठी भूमिपुत्र तालुका वैद्यकीय अधिकारी मूळगावी मुक्कामी

हे रुग्णालय लवकर सुरु झाल्यास रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. तसेच त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. हे रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image