राज्यातील पहिला प्रयोग : कोवीड पेट्रोल वाहनांद्वारे गस्त- एसपी मगर

फोटो
फोटो

नांदेड : शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता कमी कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण पडू नये व त्यांच्या सुरक्षेसाठी मुख्यालयातील ४५ दुचाकी कोवीड पेट्रोलींगसाठी सज्ज केल्या आहेत. सायरन, पीएसी आणि माईक यंत्रणा, अंबर दिवे, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांचे नागरिकांना आवाहनाचे ध्वनीफीत असलेल्या या दुचाकी कन्टेनमेन्ट झोनसह संपूर्ण शहरात गस्त घालणार आहेत. या दुचाकींना जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर  आणि महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांनी मंगळवारी (ता. १९) सायंकाळी सात वाजता हिरवी झेंडी दाखविली. यानंतर शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली.

नांंदेड शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता पोलिस प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात कमी मनुष्यबळावर कायदा व सुव्यवस्था बाधीत होउ दिली नाही. हे सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर शक्य झाल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या दुचाकी वाहनाच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी (ता. १९) सायंकाळी सात वाजता सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, अभिजीत फस्के, डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, मोटार विभागाचे मंगेश पाटील, अनंत नरुटे, वाहतुक शाखेचे चंद्रशेखर कदम, संदीप शिवले, रामेश्‍वर कायंदे यांची उपस्थिती होती. 

या दुचाकीवरुन पोलिस गस्त घालणार 

कंनटेमेन्ट झोनमध्ये या दुचाकीवरुन पोलिस गस्त घालणार आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळावर हे काम होणार आहे. सायरनसह ही दुचाकी त्या भागातील नागरिकांना लॉकडाउनचे नियम व घराबाहेर न पडण्याचे आवाहन करणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या आवाजाद्वारे नागरिकांना सजग करण्यात येणार आहे. तसेच ४५ वाहनातील काही वाहने शहरात रात्री व दिवसाच्या गस्त दरम्यान का करणार आहेत. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याला चार तर शहर वाहतुक शाखेला प्रत्येकी चार गाड्या देण्यात आल्या. लवकरच या गाड्यांना जीपीएस सीस्टीम लावण्यात येणार आहे. 

नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये 

माईक सिस्टिम असल्याने एका कर्मचाऱ्यांव्दारे हे वाहन जमावाला पांगवू शकणार आहे. 
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळावे. बॅरिकेट्स काढल्यामुळे लॉकडाउन संपले नाही. लॉकडाउनचा चौथा टप्पा लवकरच जाहीर करण्यात आला असून कोरोना या गंभीर आजाराला नागरिकांनी सहज घेऊ नये. प्रशासनाला सहकार्य करा आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com