महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबील भरा- मुख्य अभियंता पडळकर

file photo
file photo

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे महावितरणच्या वीजबील वसुलीला खीळ बसली आहे. लॉकडाऊनच्या काळात वीजबील भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा अत्यल्प वापर व उदासीनता यामुळे नांदेड परिमंडळातील वीजग्राहकांनी मे महिन्यामध्ये वीजबील भरन्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. 

एकूण देयकाच्या केवळ सात टक्केच बिलाची वसुली झाली आहे. केवळ ३३ हजार ८३९ वीजग्राहकांनी चार कोटी ७४ लाख रूपयांचा वीजबील भरना केला आहे. परिणामी महावितरण कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वेळेत वीजबील भरणे अत्यावश्यक असल्याचे मत मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी व्यक्त केले.

वीजग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून घ्यावे

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्याशी वेबनॉरव्दारे संवाद साधत असताना मुख्य अभियंता श्री पडळकर बोलत होते. याप्रसंगी अनेक संघटनांच्या प्रतिनिधींची मते विचारात घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखंडीत वीजपुरवठयासोबतच वीजग्राहकांना ऑनलाईन पर्यायांचा वापर करून वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याविषयी निर्देश दिले. महावितरण प्रशासनाने वीजग्राहकांना घरी बसून वीज मीटर रिडींग घेण्यापासून ते वीजबील भरण्यापर्यंत मोबाईल ॲपसह अनेक पर्यायांची सुविधा निर्माण करून दिली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करून घ्यावे. 

महावितरणचे यौध्दे हे २४ तास आपल्या सेवेत

तसेच महावितरणच्या वेबसाईटवर दिलेल्या पर्यायांचा वापर करून वीजबिलांचा भरना करावा. महावितरणचे यौध्दे हे २४ तास आपल्या सेवेत कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे आपण जरी घरात असलात तरी महावितरणचा कर्मचारी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी दिवसरात्र आपल्या घराबाहेर सज्ज आहे. आम्ही अखंडीत वीजसेवेसाठी प्रयत्नरत आहोत अशा प्रसंगी वीजग्राहकांनीही आपली जबाबदारी ओळखून वीजबील भरावे जणेकरून महावितरणसमोर आवासून उभ्या टाकलेल्या आर्थिक संकटाचा सामना करने शक्य होईल असे आवाहनही त्यांनी केले.

परिमंडळात ८७ वीजबील भरणा केंद्र सुरु

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुशंगाने शासनाने तयार केलेल्या प्रमाणीत कार्यप्रणालीचा अवलंब करत गेल्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधी नंतर महावितरणची वीजबील भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी नांदेड, परभणी व हिंगोली यांच्या परवानगीनुसार नांदेड जिल्ह्यात ४२ ठिकाणी, परभणी जिल्ह्यात २६ ठिकाणी व हिंगोली जिल्ह्यात १९ ठिकाणी वीजबील भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

महावितरणच्या महसुलात होणारी घट 

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईनची सोय असली तरी अनेक वीजग्राहक भरणा केंद्रावर जावूनच वीजबील भरणे पंसत करतात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महावितरणचा महसूल मोठ्या प्रमाणावर घटला होता. वीजग्राहकांची होणारी अडचण व महावितरणच्या महसुलात होणारी घट लक्षात घेवून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपाययोजनाच्या आधीन राहून योग्य ती काळजी घेत वीजबिल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना शारिरिक अंतर ठेवत कामाच्या ठिकाणी हॅन्डवॉश, सॅनीटायझरचा वापर करणे तसेच कामाच्या वेळेचे भान राखत मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू, ठिकाणे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा

सध्या लॉकडाऊनमुळे बँकींग व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने १० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी ‘आरटीजीएस व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच सिंगल किंवा थ्रीफेज घरगुती वीजग्राहकांनाही आता १० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम या प्रणालीद्वारे भरता येईल. यासोबतच सर्वच प्रकारच्या ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे क्रेडीट कार्ड, नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, गुगल पे, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेट आदींद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा सुरु राहणार आहे. 

महावितरणचे आवाहन

वीजग्राहकांनी लॉकडाऊनची स्थिती पाहता शक्यतो ऑनलाईनचा वापर जास्त प्रमाणात करावा त्याचबरोबर वीजबील भरणा केंद्राच्या ठिकाणी शारिरिक अंतराची मर्यादा सांभाळत व तोंडावर मास्कचा वार करूनच वीजबिलाचा भरणा करावा असे अवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com