
हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यात २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ मध्ये एकूण ६२५८ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२ या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता करण्यात आले होते.