Video- कुंडलवाडी नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा- शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार विजयी 

अमरनाथ कांबळे
Thursday, 1 October 2020

बहुमत असलेल्या भाजपाला जोरदार झटका, भाजपाच्या पाच नगरसेवकांनी केली बडखोरी

कुंडलवाडी (जिल्हा नांदेड) : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत नगरपालिकेवरील भाजपाकडील सत्ता खेचून महाविकास आघाडीचा दणदणित विजय झाला. त्यात शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या आहेत.

कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. आरुणा कुडमूलवार यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना नगररचना विभागाने अपात्र केले होते. रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूकीची प्रक्रिया ही गुरुवारी (ता. एक) सकाळी ११ वाजता नगरसेवकांची व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे विशेष सभा घेऊन पार पडली आहे. त्यात महाविकास आघाडीने भाजपाचा दणदणित पराभव करत नगरपालिकेवर आपला झेंडा फडकविला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेखा नरेश जिठ्ठावार यांना १० मते मिळाली. तर भाजपच्या शेख रिहाना पाशामियॉ यांना सहा मते मिळाली आहेत. तर एक मत तठस्थ राहिले आहे. 

हेही वाचा नांदेड : अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड नगरला तर विजय कबाडे भोकरला

यांनी घेतला निवडणुकीत सहभाग
 
महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेनेच्या सुरेखा नरेश जिट्ठावार, शैलेश ऱ्याकावार, काँग्रेसचे शेख मुख्त्यार खाज्यामियॉ, नंदाबाई अशोक कांबळे, सावित्रा पोषटी पडकुटलावार, भाजपचे सचिन कोटलावार, शंकुतला गंगाधर खेळगे, प्रयागबाईं मुरलीधर शिरामे, सुरेश कोंडावार, शंकर गोणेलवार यांनी मतदान केले. तर भाजपाच्या बाजूने विठ्ठल कुडमूलवार, अनिता पुप्पलवार, अशोक पाटील खुळगे, शेख रिहाना पाशामियॉ, शिवसेनेचे गंगाप्रसाद गंगोने, काँग्रेसचे गंगामणी संजय भास्कर यांनी मतदान केले आहे. तर तठस्थ म्हणुन विना नागेश कोटलावार हे राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 

यांची होती उपस्थिती

यावेळी निवडणूक पीठासीनअधिकारी म्हणुन उपविभागीय जिल्हाधिकारी शरद झाडके, प्रभारी मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी आमदार अमर राजुरकर, रावसाहेब अंतापुरकर, माजी आमदार सुभाष साबणे, शिक्षण सभापती संजय बेळगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विक्रम साबने, संतोष कुलकर्णी, नगरसेवक संदिप सोनकांबळे, शिवाजी पाटील पाचपिपलीकर, विश्वनाथ समस, शंकर मावलगे, सुनील बेजगमवार, राजू पोतनकर, प्रदिप आंबेकर, शेख मुख्त्यार, शैलेश ऱ्याकावार, भीम पोतनकर, सचिन पाटिल, अभिजीत धरमुरे आदिसह काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहरात कड़क बदोबस्त ठेवला होता.

येथे क्लिक करा - हिंगोलीत दसऱ्यानिमित्त बासा पूजनाचा कार्यक्रम  

भाजपाला आत्मपरिक्षण करण्याची गरज 

गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती. पण भाजपच्या सत्ताधारी नेत्याच्या एकाधिकारशाहीमुळे आज भाजपाच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या सुरेखा जिट्ठावार यांना विजयी केले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे पानिपत झाले असून कुंडलवाडी भाजपाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag of Mahavikas Aghadi on Kundalwadi Municipality - Shiv Sena's Surekha Jitthawar wins nanded news