esakal | हिंगोलीत दसऱ्यानिमित्त बासा पूजनाचा कार्यक्रम  
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खाकी बाबा मठ संस्थानचे महंत कौशल्यदास महाराज यांच्या हस्ते बासा पूजन करण्यात आले

हिंगोलीत दसऱ्यानिमित्त बासा पूजनाचा कार्यक्रम  

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव या वर्षी साधेपणाने साजरा होणार आहे . त्यानिमित्ताने सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने गुरुवारी ता.एक  शहरातील खाकी बाबा मठ येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या बासा पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

खाकी बाबा मठ संस्थानचे महंत कौशल्यदास महाराज यांच्या हस्ते बासा पूजन करण्यात आले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, पंचायत समिती अध्यक्षा श्रीमती झुळझुळे, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शिंदे,  श्याम खंडेलवाल, राजेंद्र हलवाई, श्याम शेवाळकर, बाबा घुगे, राजीव उपाध्ये, विलास गोरे, संजर ढोके, सु‌र्यकांत अण्णा गोटरे आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा आगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा- डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना

रावण दहनाचा कार्यक्रम खाकी बाबा मठ येथे होणार

या वर्षी विशेष म्हणजे दसऱ्यातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण असलेल्या रावण दहनाचा कार्यक्रम खाकी बाबा मठ येथे होणार आहे. तसेच यावर्षी शहरातील रामलीला मैदानावर रामलीला होणार नसून ती खाकी बाबा मठ येथे दहा दिवस दसरा समितीचे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व जनतेने याची नोंद घेऊन प्रशासनास व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती सहकार्य करावे ‌असे आवाहन करण्यात आले आहे.

१६६ वर्षाची परंपरा या महोत्सवाची

दरम्यान, हिंगोली येथील दसरा सर्वदूर प्रसिद्ध आहे. १६६ वर्षाची परंपरा या महोत्सवाची आहे. दरवर्षी शहरातील रामलीला मैदानावर दहा दिवस औद्योगिक प्रदर्शनी उभारुन तसेच या मैदानावर रात्री दहा दिवस रामलीला कार्यक्रम साजरा केला जातो. दहा दिवस उतर प्रदेशातील रामलीलेचे कलावंत रामलीला सादर करतात हे पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील गावकरी देखील येतात. 

येथे क्लिक करावेबिनार : जागर बालरक्षकाचा आणि बाल हक्क संरक्षणाचा -

यावर्षी कयाधु नदी काठावर असलेल्या खाकीबाबा मठात रामलीला होणार

तसेच दहा दिवस नव्हान पारायण, रामजन्मोत्सव हे कार्यक्रम देखील असतात. याच्या जोडीला प्रदर्शनात विविध साहित्य विक्रीची दुकाने, खवय्यासाठी चाट भंडारे, शेगाव कचोरी, पाँपकाँन, भेळ, पाणीपुरी आदी पदार्थ उपलब्ध असतात तर बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य गगनचुंबी आकाश पाळणे, मिक्की माऊस आदी साहित्य उपलब्ध असल्याने दहा दिवस शहरात कार्यक्रमाची रेलचेल असते. याच्या जोडीला दुर्गा महोत्सव देखील असल्याने दहा दिवस शहरातील रस्ते गर्दीने फुलून जातात. यावर्षी मात्र या कार्यक्रम कोरोना मुळे बंधने आल्याने यावर्षी कयाधु नदी काठावर असलेल्या खाकीबाबा मठात रामलीला होणार आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे