esakal | Video - मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा नवीन पिढीमध्ये रुजविण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिन गुरुवारी (ता.१७ सप्टेंबर) साजरा झाला. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून ध्वजवंदन केले.

Video - मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा नवीन पिढीमध्ये रुजविण्याची गरज

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देवून तसेच अन्याय, अत्याचार सहन करून निजामांच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त केला. त्यांचा हा लढा नवीन तसेच येणाऱ्या पिढीला सांगण्यापेक्षा त्यांच्यामध्ये रुजविण्याची गरज आहे. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मूल्य मर्यादीत न राहता ते अनंतकाळ टिकविले पाहिजेत, असे मत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिन गुरुवारी (ता.१७ सप्टेंबर) साजरा झाला. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत माता गुजरीजी विसावा उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून ध्वजवंदन केले. त्यावेळी श्री. चव्हाण शुभेच्छापर भाषणात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलक्रणी, आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, श्यामसुंदर शिंदे, विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेड : कोरोनामुळे मृत्यू स्वस्त पण अंत्यविधी अवघड
 
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देवून श्री. चव्हाण म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थानाच्या जटील राजवटीतून मराठवाडा मुक्त झाल्यामुळेच आपल्याला आज हा सुवर्णदिवस बघायला मिळत आहे. यामध्ये अनेकांचे योगदान आहे. अनेकांना प्राणांची आहुती द्यावी लागलेली आहे. त्यामुळे निजामाच्या सरकारने केलेला अन्याय, अत्याचाराच्या गोष्टी नवीन पिढीने आपल्या पूर्वजांकडून ऐकलेल्या आहेत.  

हे देखील वाचाच - मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा

मात्र, यापुढे नवीन तसेच येणाऱ्या पिढीला आपल्या पुर्वजांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेल्या प्राणांची आहुती, त्यांना अन्याय, अत्याचार कशाप्रकारे सहन करावा लागला आणि मराठवाडा मुक्त झाला हा कालावधी सहजासहजी लक्षात येणार नाही. त्यामुळे जुन्या आणि नव्या पिढीला हा लढा सांगून त्यांच्या रूजला पाहिजे.   

येथे क्लिक कराच - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी

स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान व स्वातंत्र्याची मूल्ये नवीन तसेच येणाऱ्या पिढीला किती प्रामाणिकपणे देतो हे महत्त्वाचे आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला. त्यामध्ये अनेकांचा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीला जनतेच्या चळवळीचे स्वरूप स्वामी रामानंद तीर्थ यांनी आणले होते.  गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण, अनंतराव भालेराव, राजाराम देशमुख बारडकर, श्रीनिवास बोरीकर असा कितीतरी स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त केला आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्रामापुरती ही मूल्ये मर्यादीत न राहता, ती अनंतकाळ टिकविण्यासाठीचे प्रयत्न व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.