माहूरला दुचाकीला धडक देऊन पळ काढणारा ट्रक जमावाने पेटावला

साजीद खान
Friday, 15 January 2021

नागरिकांनी पाठलाग करून अंजनखेडजवळ ट्रकला अडवून पेटवून दिला. तसेच चालकालाही बेदम मारहाण केली.  

माहूर (जि.नांदेड) : माहूरवरून आदिलाबादकडे जाणाऱ्या केटीसी कंपनीच्या सिमेंट वाहू ट्रकने गुरुवारी (ता.१४) रात्री आठ वाजताच्या सुमारास वाईबाजार रेणुकानगरी जवळ दोन दुचाकीवर स्वारांना धडक देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,  नागरिकांनी पाठलाग करून अंजनखेडजवळ ट्रकला अडवून पेटवून दिला. तसेच चालकालाही बेदम मारहाण केली.  

कोठारी ते धनोडा राष्ट्रीय महामार्गावर सारखणीपासून माहूर बायपासपर्यंत अपघाताची मालिका थांबता थांबेना अशी अवस्था झाली आहे. या मार्गावर कित्येक जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. गुरुवारी माहूरकडून आदिलाबादकडे भरधाव जाणाऱ्या खान कन्स्ट्रक्शन कंपनी आदिलाबाद (केटीसी)च्या टी.एस.०१ यू.ए.७७०३ क्रमांकाच्या सिमेंटवाहू ट्रकने वाईबाजार येथील रेणुका नगरी जवळ एका दुचाकीला जबर धडक दिली. त्यात उमरा तांडा येथील विनोद उत्तम राठोड दुचाकीवर जात असताना त्यांच्या गुप्तांगाला मार लागून गंभीर तर गणेश उत्तम राठोड याला किरकोळ दुखापत झाली. 

हेही वाचा - पेट्रोलच्या दरामध्ये मध्येही...भारतात परभणी...! 

दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने तेथून ट्रकसह पळ काढण्याचा प्रयत्न करत सुसाट वेगाने ट्रक पळविला असता सदर ट्रक अंजनखेड एका शेतात घुसला. दरम्यान पाठलाग करणाऱ्या जमावाने ट्रक चालक राहुल कुमार पंडित (रा. बिहार) याला बेदम चोप देऊन सिंदखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. तर काही अती उत्साही कार्यकर्त्यांनी केटीसीचा ट्रक पेटवून दिला. अपघातात गंभीर जखमी विनोद राठोड व त्याचा भाऊ गणेश राठोड यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचाच - नांदेड जिल्ह्यातील मतदार कोणाला देणार तिळगुळ ; ९०७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

सिंदखेड पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून अपघात आणि ट्रक जळीत प्रकरणात अद्यापपर्यंत फिर्याद दाखल झालेली नसल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. सदर प्रकरणात वाहनचालकाला बेदम मारहाण करून ट्रक पेटविण्याचा कारनामा येथीलच एका राजकीय पक्षाच्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा सर्वत्र असून सिंदखेड पोलीस आता या प्रकरणाला कशा पद्धतीने हाताळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथे क्लिक कराच - नांदेड : सिकंदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाला सुरुवात

कारण अपघातग्रस्त झालेल्या मोटरसायकल चालकाच्या भावाला ‘तूनेच ट्रक पेटवला, तुझ्यावर गुन्हा दाखल होणार’ अशा स्वरूपाच्या धमक्याचे फोन येत आहे. वास्तविक दुचाकीचा अपघात झाल्यानंतर त्याचा भाऊ त्यांना घेऊन माहूर दवाखान्यात होता. या सर्व घटनाक्रमामुळे सिंदखेड पोलीस चोर सोडून संन्याशाला फाशी देतो की, काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Fleeing Truck Was Hit By A People Nanded Accident News