
नांदेड : लेंडी धरणाच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. लातूर, उदगीर व कर्नाटक भागातील अतिवृष्टी व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेले असून परिणामी लेंडी नदीचे पाणी गावांमध्ये घुसले आहे.