महादेवाला आवडणारे हे फूल दूर्मिळ, कोणते ते वाचा...

रामराव मोहिते
Friday, 14 August 2020

‘बेलाच्या वृक्षाला’ श्रावण महिन्यात अनन्य महत्त्व प्राप्त असून, या बेलाची त्रीदळी पाने शिव पुजेसाठी अग्रणी मानली गेल्याने या परिसरातील वन मजूराला या बेलफुलाच्या विक्रीतून प्रतिवर्षी चांगली रोजगाराची संधी प्राप्त होत असे.

घोगरी (ता. हदगाव) : हदगाव तालुक्यातील घोगरी या भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ‘बेलाच्या वृक्षाला’ श्रावण महिन्यात अनन्य महत्त्व प्राप्त असून, या बेलाची त्रीदळी पाने शिव पुजेसाठी अग्रणी मानली गेल्याने या परिसरातील वन मजूराला या बेलफुलाच्या विक्रीतून प्रतिवर्षी चांगली रोजगाराची संधी प्राप्त होत असे.

परंतु “कोरोना” च्या उद्भवलेल्या संकटामुळे, प्रकृतीने दिलेला हा अनमोल ठेवा विकण्याची संधी हुकल्याने या भागातील वन मजुराचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या देशावर आलेलं आरिष्ट लवकर दूर व्हावं म्हणून देवाला साकडे घालताना दिसत आहेत. “ श्रावण महिना म्हणजे, धार्मिक उत्सवाची जणू पर्वणीच. नागदेवतेचा पवित्र सण “नागपंचमी” व महिलांच्या अति जिव्हाळ्याचा भाऊ- बहिणीच्या स्नेहाच प्रतीक असलेला “भाऊबीज” हा सण याच महिन्यात येतो. याच श्रावण महिन्यात निसर्गही आपली परमोच सीमा गाठताना दिसतो. जिकडे पाहावे तिकडे हिरवेगार रान, माळ- रानातून खळखळ वाहणारा निर्झर, असं निसर्गाचे देखणं रूप याच महिन्यात दिसतं. ते पाहताना मनाला हर्ष वाटतो.

हेही वाचापुतण्या मला वाचव... म्हणण्याची काकावर आली वेळ

महादेवाला बेलफुल अर्पित करण्याची प्रथा आजही रूढ 

याच महिन्यात शिवभक्ताकरवी प्रत्येक सोमवारी धार्मिक मान्यतेनुसार ‘ शंभू महादेव’ मंदिरात जाऊन मोठ्या श्रद्धेने, भक्तीभावाने, बेलफुल अर्पित करण्याची प्रथा आजही रूढ असल्याने शंभू महादेवाच्या प्रत्येक मंदिर परिसरात देव दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसते. या परिसरातील बहुतांश जंगलात निसर्गरित्या बेलाची वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने व या पवित्र महिन्यात देव मंदिर ठिकाणी, शहरी भागाच्या ठिकाणी बेलफुल विक्रीतून या भागातील वनमजूरदाराला यातून चांगली मिळकत मिळत असल्याने ते श्रा वण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु,“कोरोना” मुळे सर्वत्र धार्मिक स्थळे देवदर्शनासाठी बंद करण्यात आल्याने, ही निसर्गदत्त विनामूल्य मिळणारा रोजगार त्यांना हातातून गमवावा लागला.
 
बेलफुलाच्या विक्रीतून चांगली कमाई

दूर जंगलातून निस्रगरित्या मिळणाऱ्या बेलवृक्षाची बेलफुल घरी आणून त्यांचे योग्य संकलन करुन गट्टी तयार केली जाते. एक पाण बेल, पाच पान बेल या पानाला अधिकचे महत्व असते. महिलांच्या वतीने या बेलपत्राची मागणी अधिक असते. परंत कुठे तरी दूर्मीळ बेल वृक्ष आढळतो. हे बेल पत्र शोधण्यासाठी मोठी चढाओढ असते. यातून वर्षाकाठची मिळकत मिळते. गंगाराम जाधव, घोगरी, बेलपत्र विक्रेता

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This flower that Mahadev loves is rare, read which one nanded news