धो-धो वाहणारा सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत

गंगाराम गड्डमवार
Friday, 10 July 2020

पैनगंगा नदीला पुर आल्याने, पर्यटकांना आकर्षित करणारा सहश्रकुंड धबधबा पहाण्यासाठी दरवर्षी असणारी गर्दी पहाता यावर्षी कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसला आहे

ईस्लापूर (जिल्हा नांदेड) : मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धो- धो वाहू लागला आहे. पैनगंगा नदीला पुर आल्याने, पर्यटकांना आकर्षित करणारा सहश्रकुंड धबधबा पहाण्यासाठी दरवर्षी असणारी गर्दी पहाता यावर्षी कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका बसला आहे. पर्यटकांची गर्दी रोडावली असल्याचे चित्र दिसत आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालूक्यात ईस्लापूर गावापासून उत्तरेश चार किलोमिटर अंतरावर मराठवाडा आणि विदर्भाच्या सरहद्दीवरुन वाहाणा-या पैनगंगा नदीवर भगवाण परशुरामानी बाण मारून सहस्रकुंडाची निर्मिती& केली. अशी धार्मिक आख्यायिका आहे. पैनगंगा नदीला बाण गंगा म्हणुन प्रचलित नावाने ओळखल्या जाते. खरोखर या पैनगंगा नदीवरील मोठ्या उंचावरुन पडणारा सहस्रकुंड धबधब्यास मात्र निसर्गाने सौंदर्याची सहस्र हातानी उधळन केली असल्याने या ठिकाणी तिच्या सहस्रधारांनी अंत नसलेल्या दगडी शिळांणी आकर्षित शिळाच्या खोलवर असलेल्या कुंडात अगदी स्वच्छपणे स्वत : ला झोकून देत असलेले दृष्य निश्चितच पर्यटकांचे डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. म्हणुनच महाराष्ट्र शासनाने पर्यटनस्थळ म्हणुन घोषणा केली आहे. 

हेही वाचा - बाबो...प्रयोगशाळेतील साहित्यच केले गुल?

माहूरचे भाविक व पर्यटक सहस्रकूंड धबधबा पाहण्यासाठी आवर्जुन भेट देतात

तसेच या पैनगंगा नदीतिरावर पूरातण काळाचे भक्ताना पावणारे हेमाडपंथी शिवमंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरल्या जाऊन हजारो भाविक स्नानाचा लाभ घेउन महादेवाचे दर्शन घेतात. तसेच श्रावण महिण्यात दर सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगण, आंध्राप्रदेश या राज्याच्या काना कोप-यातून तिर्थक्षेत्र, माहुर दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटक सहस्रकूंड धबधबा पाहण्यासाठी आवर्जुन भेट देतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भरपूर पाणी असते. तेंव्हा येथील धबधब्याचे सौंदर्य कांही औरच असते. तसेच सहस्रकुंड हे पाषानी शिळांचा नजराना मनाला आकर्षित करणारा आहे. पाण्याअभावी गेल्या चार महिण्यापासुन बंद असलेला धबधबा खळखळुन वाहु लागला आहे. यावर्षी कोरोना विषानूमुळे लावण्यात आलेल्या लाॉकडाउनमुळे पर्यटकांची संख्या खुपच रोडावली आहे.

सहस्रकुंड धबधबा नांदेडची ओळख

पैनगंगा नदीवर असलेल्या या धबधब्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विद्यार्थी, महिला यांच्यासह अधिकारी वर्गही आपल्या कुटुंबियांसह हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी येत असतात. नांदेड शहरापासून १० किलोमिटर अंतर असलेल्या या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जात असतात. मात्र या वर्षी कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने पर्यटक गर्दीच्या ठिकाणी जाण्यास तयार नसल्याने हे निसर्गरम्य धबधबा पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे.

शब्दाकन- प्रल्हाद कांबळे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flowing Sahastrakund waterfall waiting for tourists nanded news