कन्टेनमेंट झोनमध्ये नियम पाळा, बंदी उठविण्यात येईल- डॉ. विपीन

फोटो
फोटो

नांदेड : येथील अबचलनगर कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांनी प्रशासनाचे दिशानिर्देश तंतोतंत पाळल्यास आणि पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ न झाल्यास लवकरच कन्टेनमेंट झोन उठवण्यात येईल. पण नागरिकांचे असहकार्य लाभल्यास नाइलाजाने कालावधी दिशानिर्देशानुसार अमलात ठेवाव्या लागतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवार (ता. १०) अबचलनगर कमानीजवळ नागरिकांशी संवाद साधताना केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजीतपालसिंघ संधू, सहआयुक्त सुग्रीव अंधारे, सहआयुक्त प्रकाश गच्चे, अधीक्षक घनश्याम परडे आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांशी चर्चा केली

अबचलनगर झोनचा आढावा घेतेवेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांशी चर्चा केली. यात गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविंदरसिंघ बुंगाई, बोर्डाचे सदस्य गुरमीतसिंघ महाजन, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्रसिंघ मोटरावाले, नगरसेवक संदीपसिंघ गाड़ीवाले, माजी उपमहापौर सरजीतसिंघ गिल, पत्रकार रविंदरसिंघ मोदी, महेंद्रसिंघ लांगरी, अमरजीतसिंघ महाजन यांनी विविध विषय निदर्शनास आणून दिले. 

येथे राहणाऱ्या सर्व कुटुंबियांची सुरक्षा हे प्रथम ध्येय

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, अबचलनगरमधील काही रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले. पुढे एका रुग्णाच्या मृत्यूमुळे नियमानुसार २८ दिवसासाठी कन्टेनमेंट झोन येथे अंमलात आणले गेले. यानंतर येथे राहणाऱ्या सर्व कुटुंबियांची सुरक्षा हे प्रथम ध्येय आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा अंगण परिसरात गोळा होऊन बसू नयेत. पण येथील नागरिक विशेष म्हणून युवक मंडळी नियमाविरुद्ध जाऊन घोळक्यात फिरत असल्याच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. मॉर्निंग वॉक आणि इवनिंग वॉकचा प्रकार योग्य नव्हे. यामुळे व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. म्हणून स्वतः ची आणि इतरांची सुरक्षा कशी अबाधित राहिल याचा विचार झाला पाहिजे. 

कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी महापालिका सज्ज

जिल्हाधिकारी यांनी कोरोना संक्रमित रुग्णांना चांगले जेवण आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. महानगर पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाणे यांनी नागरिकांना कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी समुपदेशन केले. जीवनावश्यक वस्तुंचे एकाच वेळी संग्रहण करण्याचे तसेच मधुमेह आणि ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी औषधी आणि गोळ्या मागवून ठेवाव्यात असे आवाहन केले.

कन्टेनमेंट झोनवर ड्रोनद्वारे निगराणी
 
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले की, अबचलनगर कन्टेनमेंट झोनवर ड्रोनद्वारे निगा ठेवण्यात येईल. नियमांचे उल्लंघन कारणाऱ्यांवर पुढे कड़क करवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. 
--पूर्ण--प्रल्हाद कांबळे--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com