esakal | नांदेड पोलिस दलातील ५३ जणांना बढती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेवाजेष्ठतेनुसार पोलिस, पोलिस नाईक आणि हवालदार या श्रेणीतील ५३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

नांदेड पोलिस दलातील ५३ जणांना बढती

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पदात सेवाजेष्ठतेनुसार पोलिस, पोलिस नाईक आणि हवालदार या श्रेणीतील ५३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्न्तीचा आदेश पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शनिवारी (ता. नऊ) जारी केला आहे.

पोलिस हवालदार ते सहाय्यक फौजदार  : 

कैलास पवार, खयुम शेख, मिलींद दवणे, अशोक काकडे, अरुण चव्हाण, भास्कर कराड,  महमुद सय्य्द, बंडू मोरे, गौत्तम जोंधळे, अहेमद हुसेन अब्दुल, बालभारती भारती, पंडीत भिसे.

पोलिस नाईक ते हवालदार

दत्ता पाटील, जसबिरसिंग बाल, शिवाजी राठोड, राजाबाई चव्हाण, सुनिल कांबळे, आनंदा नरंगले, केशव मोगरे, विश्‍वनाथ रुंजे, धनंजय पाटील, तानाजी मुळके, हनमंत तुपकर, विठ्ठल बल्लारे, उदय जोशी, ईश्‍वर लांडगे, चंदर अंबेवार, शिवाजी वरपडे, अत्राम कामजळगे, दिगांबर भंडारे, बसवेश्‍वर मंगनाळे, माधव गोणाकुडतेवार, पंडीत अन्चे. 

पोलिस शिपाई ते पालेस नाईक : 

हिफजूर रहेमान रहीम शेख,  अविनाश पांचाळ, बसंतसिंग रामगडीया, शिवशंकर शिंदे, शोभाताई कदम, गमाजी कानगुलवार, बालाजी सातपुते, गजानन कदम, उद्धव पांचाळ, बालाजी बोरकर, चंद्रप्रकाश गायकवाड, सुनिता केंद्रे,  म. अलीम म. हाजी, म. अझीरोद्दीन म. वल्लीयोद्दीन, अंकुश आरदवाड, त्र्यंबक देशमुख, सविता जाधव, मुक्ताबाई पवार, विजयकुमार मुखेडकर, गुरदीपसिंग सरदार आणि जगन्नाथ केंद्रे यांची पदोन्नती झाली आहे. 

हेही वाचा -  नांदेडमध्ये हातभट्टी व देशी दारुसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त
ह्रदयविकाराने पोलिसाचा मृत्यू 
शहर वाहतुक शाखेत होते कार्यरत

नांदेड : येथील शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेले पोलिस नाईक सादिकखान पठाण (वय ५३) यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने शुक्रवारी (ता. आठ) निधन झाले. खबरजदारी म्हणून त्यांचा शवविच्छेदन व स्वॅब तपासणी अहवाल घेण्यासाठी सहाय्यक फौजदार संतोष केदार यांची नियुक्ती केली आहे. 

शहराच्या शारदानगर भागातील राहणारे व सध्या शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेले सादिकखान जुम्माखान पठाण (बन १९२) यांची प्रकृती बरी नसल्याने ते ता. दोन मेपासून किरकोळ रजेवर व त्यानंतर पुन्हा ता. तीन मेपासून अर्जीत रजेवर होते. त्यांच्यावर येथील विष्णुपूरी शासकिय रुग्णालयात कोवीड- १९ ची तपासणी करण्यात आली. मात्र कोवीडचे लक्षण नसल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. त्यानंतर ते आपल्या निवसास्थानी गेले. मात्र शुक्रवारी (ता. आठ) त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुल, दोन मुली असा परिवार आहे.

loading image
go to top