अपघात कमी होण्यासाठी वाहतुक नियमाचे पालन करा- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 9 February 2021

शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृतीपर प्रबोधन कार्यक्रम कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे संपन्न झाला.

नांदेड : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी रस्ते वाहतूक विषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृतीपर प्रबोधन कार्यक्रम कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी रस्ते अपघातांची कारणे व ते टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शनात ते बोलत होते.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 32 व्या रस्ते सुरक्षा अभियानच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रस्ते वाहतूकविषयक नियमांची माहिती दिली. अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याचे आवाहन वाहन निरीक्षक मेघल अनासने यांनी केले. रस्ता सुरक्षेची शपथ मुख्याध्यापक श्री. अंबटवाड यांनी दिली. यावेळी रस्ते सुरक्षा विषयक माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेच्या परिसरात दुचाकी व सायकलला रिफ्लेक्टर लावण्यात आले. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. रेणके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, सतीश जोशी, लक्ष्मण मस्के यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा - पंजाब पोलिसांनी खलीस्तान जिंदाबाद संघटनेशी संबंधित चार जणांविरुद्ध बंदी आदेश जारी केले होते

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पेन्शन अदालत

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी ता. नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Follow the traffic rules to reduce accidents - Assistant Regional Transport Officer Anant Bhosale nanded news