जंगल गस्तीत अवैध वृक्षतोडीचे 49 सागवान नग वन विभागाने केले जप्त 

file photo
file photo

गोकुंदा (जि. नांदेड ) : गुरुवारी (ता . 22 ) रात्री 7.45 वाजता जंगल गस्त करीत असतांना येथून जवळच असलेल्या किनवट तालुक्यातील वनपरिक्षेत्र - बोधडी (बुदुक) अंतर्गत येणाऱ्या लिंगदरी परिक्षेत्रात चिखली ( बुद्रूक) येथील 20 ते 25 जनांची कुख्यात वनतस्करांची टोळी जंगलामध्ये अवैध वृक्षतोड करत असताना दिसून आली. त्यांना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करीत असतांना घनदाट जंगलव रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाले. परंतु यावेळी त्यांनी तोडलेल्या जीवंत वृक्षांचे सागवान (49 नग ) जप्त करण्यात आले. 

नांदेडचे उप वनसंरक्षक सातेलीकर, सहायक वन संरक्षक श्री. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेञ अधिकारी एस. यू. जाधव,  वनपरिमंडळ अधिकारी बी. टी. जाधव, वनरक्षक व्ही. बी. बोर्डे, टी. एस. तोटावाड, जी. एस.देवकांबळे, वनमजूर कांबळे व चालक बालाजी राठोड यांनी ही कारवाही केली असून पाटोदा (खुर्द) येथील वनपालांनी वन गुन्हा  नोंद केला आहे.

मोटरसायकलवर अवैध लाकडे नेणाऱ्या जोडप्यापैकी महिला आरोपी ताब्यात

दुसऱ्या एका घटनेत मंगळवारी ( ता. 20 ) सकाळी नऊ वाजता फिर्यादी वैद्य हे गस्त करीत असताना त्यांना मोटरसायकलवर एक महिला व एक पुरुष सागवान लाकडे घेऊन येताना दिसले. त्यांनी पाठलाग केला असता सय्यद इस्माईल सय्यद यांच्या फर्निचर मार्टजवळ त्या दोन जोडप्याने लाकडे टाकली. लाकडे जप्त करण्याच्या ओघात वकीलाबी शेख कादर व शेख कादर शेख हबीब या दोघांनी मिळून वनरक्षक वैद्य यांची कॉलर पकडून महाराण करून येथून ते पसार झाले. 

कादर शेख हा फरार झाला व महिला आरोपी वकीलाबी शेख कादर यांना ताब्यात घेतले.

त्यांनंतर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी वनरक्षकांना तीलाकडे जप्त करून पीओआर सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यांना सदर आरोपी महिला व पुरुष पोलिस स्टेशनसमोर दिसले. त्यापैकी कादर शेख हा फरार झाला व महिला आरोपी वकीलाबी शेख कादर यांना ताब्यात घेतले. सदर महिलेला (ता. 20) रात्री 8 वाजता अटक केली व बुधवारी (ता. 21) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीसांनी त्यांना एनसीआरवर कारागृहात रवाना केले. सदर महिला आरोपी व पुरुषाकडून  एकूण 72 नग. घमी 0.8753 किंमत 5405 रुपयाचा माल जप्त केला. विविध कलमान्वये प्रथम गुन्हा रिपोर्ट 26/2020 जारी केला. सदर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला आरोपीवर यापूर्वीही दोन वेळेस गुन्हे नोंद केलेले आहेत. तसेच याअगोदर सुद्धा सुभाष नगर येथील चार महिला आरोपींवर गुन्हे नोंद केले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com