
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या असर्जन परिसरात सोमवारी (ता. एक) फेब्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारासची घटना
नांदेड : नॅचरल दूध नांदेड येथे वाटप करुन उस्मानाबादकडे जाणारा टॅंकर दोन ओनोळखी चोरट्यांनी पद्मजा सिटीसमोर अडविला. वेळ सकाळची साडेदहाची. ट्रक चालकास पिस्तुलचा धाक दाखवून केबिनमधील नगदी दोन लाख ७७ हजार८२० रुपये ठेवलेली बॅग जबरीने चोरुन नेली. याप्रकरणी स्थआनिक गुन्हेे शाखेच्या पथकाने चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख साठ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
लातूर येथील लहू भडंगे हा ट्रक (एम.एच.09 ई. एम.1755) मध्ये उस्मानाबाद रांजनी येथील नॅचरल दूध घेऊन नांदेडला आला होता. नांदेड येथे दूध पुरवठा करुन तो आपले टॅंकर घेऊन लातूरकडे जात होता. सदर टॅंकर असर्जन मार्गावरील पद्मजा सिटीसमोर आला. यावेळी टॅंकरच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी ट्रक अडवून चालकास पिस्तुल व तलवारीचा धाक दाखविला. त्याच्या साथीदारासही धाकदाखवून कॅबिनमधील दोन लाख ७७ हजार ८२० रुपये ठेवलेली बॅग लंपास केली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, पोउपनि शेख असद, पोउपनि आशिष बोराटे व पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
चोरटे पद्मजा सिटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून त्यांचा शोध सुरु केला. याप्रकरणी लहू भडंगे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवरर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र या गुन्ह्यात सराईत असलेले चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आले होते. गुप्त माहितीवरुन सहाय्य्क पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, फौजदार आशिष बोराटे यांनी आपले सहकारी तानाजी यळगे, यसवंतसिंग शआहू, विलास कदम, मोतीराम पवार, शेख कलीम, रणधीर राजबंशी यांनी शोध सुरु केला. यावेळी त्यांनी बलप्रीतसिंग उर्फ आशिषसिंग सपुरे (वय २३), प्रतापसिंग उर्फ छोटू बाबूसिंग शइरपल्लीवाले (वय २५), रोहितसिंग दिदारसिंग सहानी (वय २०) आणि हरपालसिंग शंकरसिंग बोरगाववाले (वय २४) यांना अटक केली. या गुन्ह्याची टीप हरपालसिंग याने दिली होती. पोलिसांनी त्यांनी लंपास केलेली रक्कम वजिराबाद येथील श्रीनिवास इस्टीट्यूचे आदीत्य रदंबे याच्याकडून दोन लाख स६० हजार जप्त केले. या पथकाचे पोलिस उपमाहिनिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे,आणि विजय पवार यांनी कौतुक केले.या चारही आरोपींना नांदेड ग्रामिण पोलिसांच्या स्वाधीन केले..