esakal | नांदेड जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दीड लाखाचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दीड लाखाचा ऐवज लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: जिल्ह्यात चार चोरीच्या घटना घडल्या असून त्यात जबरी चोरी, घरफोडीचा समावेश आहे. जवळपास दीड लाखाचा ऐवज जप्त झाला असून याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमधील रहेमतनगर टायर बोर्ड येथे मोहमंद इमरान मोहमंद गौस (वय ३४, रा. हबीबीया कॉलनी) हा त्याचा मित्र वाहाब मुल्ला यांच्या घरासमोर बोलत असताना आरोपितांनी त्यास खंजर दाखवून पैशाची मागणी केली. पैसे दिले नसल्याने दंडावर खंजरने वार करून शर्टाच्या वरच्या खिशातील २५ हजार जबरीने चोरून नेले. याबाबत नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: किनवटच्या शिवणी परिसरात पावसाची हजेरी, सोयाबीन संकटात!

शेवडी बाजीराव (ता. लोहा) येथे गंगाधर शंकरप्पा स्वामी (वय ५०) या किराणा व्यापाऱ्याने लक्ष्मीपूजन करून सोन्याचे दागिने ठेऊन दिले. त्यानंतर पत्राचे खोलीतील टिनपत्रे बाजूला करून पडक्या रुममध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटातील ६७ हजाराचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत सोनखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोमेगाव (ता. लोहा) येथील पार्वतीबाई राजू शिंदे (वय ३२) या पतीसह घराला कुलुप लाऊन बाहेरगावी गेल्या होत्या.

चोरट्यांनी कुलुप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख १२ हजार असा एकूण ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत उस्माननगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत धर्माबाद शहरातील रेल्वेगेट जवळ शेख शफी शेख मस्तान यांचे भंगार दुकान आहे. या ठिकाणी आरोपितांनी संगनमत करून महावितरण कंपनीचा १५ हजार रुपयांचा माल चोरून नेला.

सदरील माल चोरीचा आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी चोरीचा माल विकत घेतला. त्यामुळे याबाबत महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ गंगाधर वैदही यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top