अवकाळीचा हाहाकार; वीज पडून चार ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020


वायपना बुद्रुक (ता.हदगाव) येथे शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांवर वीज पडून एक महिला ठार, तर चार महिला जखमी झाल्याची घटना घडली. दुसऱ्या घटनेत नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे सायंकाळी साडेसहाच्या शेतातील झाडाखाली थांबलेल्या रामकिशन शंकरराव चिखले (वय ७०) यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. तर तिसऱ्या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी येथे पाऊस सुरु झाल्याने शेतातील झोपडीमध्ये आसरा घेण्यासाठी गेलेल्या झोपडीवर वीज कोसळून कपील आनंदराव कदम (वय २५) हा यूवक जागीच ठार झाला.

तामसा, नायगाव, हिमायतनगर, किनवट, (जि. नांदेड) ः नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी वेगवेगळ्‍या घटनांमध्ये वीज पडून एक महिलेसह तीन जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याच्या घटना गुरुवारी (ता.१४) रोजी सायंकाळी घडल्या आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सोनवटी गावात वीज पडून म्हैस दगावली.

हेही वाचा -  मुलीला पाठविले बाहेर, केला तिच्या मैत्रीणीवर अत्याचार -

वायपना बुद्रुक (ता.हदगाव) येथे शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांवर वीज पडून एक महिला ठार, तर चार महिला जखमी झाल्याची घटना घडली. दुसऱ्या घटनेत नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे सायंकाळी साडेसहाच्या शेतातील झाडाखाली थांबलेल्या रामकिशन शंकरराव चिखले (वय ७०) यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. तर तिसऱ्या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी येथे पाऊस सुरु झाल्याने शेतातील झोपडीमध्ये आसरा घेण्यासाठी गेलेल्या झोपडीवर वीज कोसळून कपील आनंदराव कदम (वय २५) हा यूवक जागीच ठार झाला. तर सुनील आनंदराव कदम (वय २८), अक्षय अवधूत कदम (वय १९), आनंदराव संतराम कदम (वय ५०) हे तिघे किरकोळ जखमी झाले. मयत कपील यांच्या मागे एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे.

चौथ्या घटनेत किनवट तालुक्यातील शिवणी येथे किशन भिसे (वय ४५) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मण देशमूखे (वय ३०) व राजू भिसे (वय ३२) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वायपना येथील घटनेत मयत जिजाबाई रामदास गव्हाणे (वय ४५) या एका शेतात रोजमजुरीवर कामासाठी गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज पडली. ज्यामध्ये जिजाबाई या जागीच दगावल्या, तर सुभद्राबाई गणेश नरवाडे (वय ६०), इंदिराबाई अशोक धनगरे (वय ४५), लक्ष्मी संदीप धनगरे (वय २५), अनिता विलास नरवाडे (वय ३०) या महिला जखमी झाल्या आहेत. मयत जिजाबाई या मुंबई येथे उदरनिर्वाहासाठी गेलेल्या होत्या. लॉकडाउनमुळे नुकत्याच त्या गावाकडे परतल्या होत्या. जखमी महिलांवर वायपना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Killed Lightning Strike In Nanded District, Nanded News