esakal | मुलीला पाठविले बाहेर, केला तिच्या मैत्रीणीवर अत्याचार 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कुंटूर (ता. नायगाव) पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १३) वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा किळसवाणा प्रकार शुक्रवारी (ता. आठ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) शिवारात घडला. 

मुलीला पाठविले बाहेर, केला तिच्या मैत्रीणीवर अत्याचार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुलीसारख्या असलेल्या एका अल्पवयीन युवतीवर जबरीने अत्याचार करणाऱ्या नराधम मैत्रीणीच्या पित्यावर कुंटूर (ता. नायगाव) पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १३) वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा किळसवाणा प्रकार शुक्रवारी (ता. आठ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास बरबडा (ता. नायगाव) शिवारात घडला. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बरबडा (ता. नायगाव) येथील १४ वर्षीय पीडीत युवती आपल्या घरासमोर थांबली होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रीणीचा वडिल तिच्याजवळ आला आणि म्हणाला की, ज्वारी कापणीसाठी येतोस का ? असे म्हणून त्या बदल्यात आधलीभर (अडीच किलो) ज्वारी देण्याचे आमिष दाखविले. ज्वारी कापताना मैत्रीण सोबत राहणार असल्याने पीडीत युवतीने होकार दिला.

हेही वाचा - Video- कोरोना : संकट गंभीर, मात्र परिस्थिती नियंत्रणात- डॉ. विपीन

नराधम सोनाजी हनमंते याचा कारनामा

शुक्रवारी (ता. आठ) रोजी गाव शेजारी असलेल्या नारायण सर्जे यांच्या शेतात ज्वारी कापण्यासाठी पीडीत युवती, तिची मैत्रीणी व तिचे वडिल सोनाजी हनमंते हे तिघेजण सकाळी गेले. नारायण सर्जे यांची शेती त्याने बटाईने केली होती. दुपारी तिघांनी मिळून जेवन केले. मात्र पाणी संपल्याचे सांगुन नराधम सोनाजी याने आपल्या मुलीला शेजारी शेतातून पाणी आणायला पाठविले. यावेळी पिडीत युवतीही पाणी आणण्यासाठी मैत्रीणीसोबत जाण्यासाठी निघाली असता त्याने तिला जावु दिले नाही. तोपर्यंत आपण ज्वारी कापण्यास सुरवात करु असे म्हणून ते दोघे शेतात गेले. 

मैत्रीणीवरील हा आघात ऐकूण धक्का
 
यावेळी पोटात कपट असलेल्या सोनाजी हनमंते याने मुलीसराख्या असलेल्या या युवतीवर हात टाकला. तिला धमकी देऊन जबरीने अत्याचार केला. यावेळई तिने आरडाओरडा केला मात्र तिचा आवाज ज्वारीच्या शेतातून बाहेर निघाला नाही. एवढेच नाही तर त्या नराधमाने तिला व कुटुंबियाला ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत युवतीची मैत्रीण जवळ येताच तिने हा घडलेला प्रकार तिला सांगितला. भयभीत झालेल्या त्याच्या मुलीनेही तिला सोबत घेऊन घर गाठले. या प्रकारामुळे पीडीत युवतीचे नातेवाईकही घाबरुन गेले. एवढे मोठे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आले. 

येथे क्लिक कराजगातील सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज

कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मात्र पिडीत युवतीने अखेर समाजात आपली झालेली बदनामी भरुन निघणार नाही. व नराधम उजळमाथ्याने फिरणार म्हणून तीने कुंटूर पोलिस ठाणे बुधवारी (ता. १३) गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांना सर्व हकीकत सांगितल्याने लगेच पठाण यांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी नायगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठविले. पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन त्यांनी नराधम सोनाजी हनमंते याच्याविरुद्ध अत्याचार व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलिस हवालदार अशोक दामोधर करत आहेत.  

loading image
go to top