esakal | सहा महिन्याच्या बालकाची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी (ता.१८) दिवसभरात दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता.१९) सकाळी प्राप्त झालेल्या १९ स्वॅब अहवालात सर्वच्या सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील सुंदरनगर येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २९७ एवढी झाली आहे

सहा महिन्याच्या बालकाची कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका सहा महिन्याच्या बालकाचा शुक्रवारी (ता.१९) दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. सहा महिन्याच्या या बालकाने कोरोना आजारावर यशस्विरित्या मात केल्याने त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. नेहमी धीर गंभीर असणाऱ्या पॉझिटिव्ह वार्डात आज सहा महिन्याचे बाळ कोरोनावर मात करुन घरी निघाल्याने वार्डातील सर्वांचे डोळे आनंदाने भरुन आले.

गुरुवारी (ता.१८) दिवसभरात दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता.१९) सकाळी प्राप्त झालेल्या १९ स्वॅब अहवालात सर्वच्या सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील सुंदरनगर येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २९७ एवढी झाली आहे. शुक्रवारी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील एक व डॉ.पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील चार असे पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले 

हेही वाचा-  जिल्हाधिकाऱ्यांमधला डॉक्टर जागा होतो तेव्हा... ​

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९७ 

आतापर्यंत एकुण १८६ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी १९ आणि सायंकाळी ४८ रुग्णांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात सुंदर नगरच्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९७ इतकी झाली आहे. त्यापैकी १८६ बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचा-  इस्लापूरच्या सहाय्यक फौजदारावर लाचेचा गुन्हा ​

 ८७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले 

तर उर्वरित १०३ बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन बाधितांमध्ये ५२ वर्षाच्या एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे. शुक्रवारी (ता.१९) ८७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होईल. जनतेने प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - २९७
मृत्यू संख्या - १३
रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - १८६
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - १०३
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या - ८७  
 

loading image
go to top