पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोणत्या निकषाने पीकविमा मंजूर केला याची माहिती नाही दिल्यास मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे दिला.
पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

धर्माबाद : पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

धर्माबाद : यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार पीक विमा कंपनीकडून संबंधित पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळेल असे निर्देश असताना जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा परतावा हा अत्यंत तुटपुंजी असून या इफको टोकियो नावाच्या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक केल्याचे समोर आले असा आरोप मनसेने केला आहे.

यावर्षी सततच्या पावसामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी, म्हणून पीक विम्याचे गाजर दाखवले होते. कधी पावसाअभावी, तर कधी पावसामुळे गेल्या चार - पाच वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामाच्या उत्पादनाचे नुकसान होण्याचे सातत्य कायम आहे. शेतकरी पीक विम्याकडे आकर्षित होतात. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यावर्षी तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर शंभर टक्के झाले आहे. म्हणजेच ज्यांचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.

हेही वाचा: शेती पाहिजे, पण मुलगा शेतकरी नको !

अशा शेतकऱ्यांना देखील तुटपुंजी रक्कम मिळाली असल्याने शेतकरी नाराज आहेत. मात्र पीकविमा कंपनीने तुटपुंजी मदत देऊन बोळवण करीत आहे. सदर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ९०० ते १००० रुपयांपर्यंतचे देखील विमा मंजूर झालेले आहेत. ते कशाच्या आधारावर कोणत्या निकषाने पीकविमा मंजूर केला गेले याची माहिती नाही दिल्यास तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा धर्माबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्याकडे दिला आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कावडे, गजानन मुड्डेवार, सतीश माळगे, सुगत पहेलवान, शिवा तोटलोड, पंकज जोशी, आकाश लोसरवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image
go to top