Education : आदिवासी विद्यार्थ्यांना ‘नीट’साठी मोफत प्रशिक्षण, दुर्गम भागात दर्जेदार शिक्षण पोहचावे म्हणून पोलिस अधीक्षकांची संकल्पना

मा. श्री. निखिल पिंगळे यांच्या हस्ते उद्‍घाटन आणि विद्यार्थ्यांना तात्काळ आयआयबीकडून प्रशिक्षण सुरु करण्यात आले.
free caoching for tribal students for neet exam
free caoching for tribal students for neet examsakal

Nanded : मा. श्री. निखिल पिंगळे यांच्या हस्ते उद्‍घाटन आणि विद्यार्थ्यांना तात्काळ आयआयबीकडून प्रशिक्षण सुरु करण्यात आले. ता.१३ जुलै रोजी या संयुक्त उपक्रमाचे उद्‍घाटन निखिल पिंगळे पोलिस अधीक्षक गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी माननीय श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री.दशरथ पाटील व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट चे समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या निःशुल्क ऑनलाइन नीट क्लासेस चा उद्घाटन गुगल मिट व्हिडिओ कन्फरंस द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी संचालक श्री.दशरथ पाटील व टीम आयआयबीची उपस्थिती होती.

दादालोरा खिडकी अंतर्गत गोंदिया पोलिस दलाच्या उपक्रमाला आयआयबीची साथ, काय आहे दादालोरा उप्रकम गोंदिया पोलिस दलाकडून आदिवासी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी या खिडकीची सुरुवात करण्याचा हेतू म्हणजे, या दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून आदिवासी जनतेला विविध शासकीय योजना दाखले.

उच्च दर्जाचे कृषी बियाणे, रोजगार व स्वयंरोजगार या सोबत विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश या खिडकीच्या माध्यमातून राबिवणे हा होता. लवकरच या योजनेला लोकांचा प्रतिसाद व सहभाग दिसून आला त्यानंतर सर्व पोलिस उपपोलिस स्टेशन व पोलिस मदत केंद्रच्या ठिकाणी पोलिस दादालोरा खिडकी तयार करण्यात आली.

सामाजिक कार्यात अग्रेसर

आयआयबीकडून गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालय आणि भामरागड येथे लोकबिरादरी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नीटसाठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील स्वप्नभूमी येथील अनाथ विद्यार्थ्यांना देखील मोफत प्रशिक्षणासाठी आयआयबी कडून मोफत ऑनलाईन शिकवणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी सोबत इतर हजारो विद्यार्थ्यांना फीसमध्ये अधिकाधिक सवलत देण्याचे कार्य आयआयबी करते. जेणेकरून ग्रामीण भागातील होतकरू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या स्वप्नांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये याकरिता आयआयबी विद्यार्थ्यांप्रती व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सहकार्याची भावना जोपासत वाटचाल करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com